somy ali khan and salman

सलमान खान(salman khan) ची आधीची गर्लफ्रेंड सोमी अली(salman khan ex girlfriend somy ali statement) सध्या चर्चेत आली आहे. तिने एका मुलाखतीत धक्कादायक विधान केले आहे.

  बॉलिवूडमधला भाईजान अर्थात सलमान खान(salman khan) ची आधीची गर्लफ्रेंड सोमी अली(salman khan ex girlfriend somy ali statement) सध्या चर्चेत आली आहे. तिने एका मुलाखतीत धक्कादायक विधान केले आहे. ९ वर्षांची असताना सुरक्षा रक्षकाने तिच्यासोबत विनयभंग केला असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर काय करावे हे कळत नसल्याचे सोमी अलीने सांगितले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Somy Ali (@realsomyali)


  सोमी अली म्हणाली की, “ जेव्हा मी आई-वडिलांसोबत पाकिस्तानमध्ये राहत होते तेव्हा ५ वर्षांची असताना स्वयंपाक करणाऱ्याने माझे ३ वेळा लैंगिक शोषण केले होते. त्यानंतर ९ वर्षांची असताना सुरक्षारक्षकाने माझ्यासोबत विनयभंग केला होता. यानंतर जेव्हा मी कुटुंबासह अमेरिकेत गेले तेव्हा १४व्या वर्षी आणि १७ व्या वर्षी माझा बलात्कार झाला होता. पुढे जेव्हा मी भारतात आले तेव्हा १६ ते २४ वर्ष वय असतानाच्या कालखंडात माझ्यावर कौटुंबिक हिंसाचार करण्यात आला होता.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Somy Ali (@realsomyali)

  सोमी अली पुढे म्हणाली की, “मी जेव्हा माझ्या पालकांना याविषयी सांगितले तेव्हा त्यांनी याविषयी कुठे काही बोलू नको असं बजावलं. मी काही चुकीचं केलं आहे का? असं मी त्यांना विचारलं होतं.” सध्या सोमी अली नो मोअर टीअर्स नावाची संस्था चालवत आहे.