भाईजान थिएटर्स मालकांच्या मदतीला, चित्रपटाबाबत घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय!

सोशल मीडियावर सलमानने जाहीर केलेले आहे की, त्याचा आगामी चित्रपट राधे चित्रपटगृहात प्रदर्शित करणार आहे. सलमानने लिहिले की, ‘सॉरी … मला सर्व चित्रपटगृहांच्या मालकांकडे लक्ष देण्यास वेळ लागला आणि मी एक मोठा निर्णय घेतला आहे त्यांची आर्थिक समस्या मी समजू शकतो.

सलमान खान आता ‘राधे’ चित्रपटात दिसणार आहे. सलमानचे चित्रपट प्रदर्शित होतात तेव्हा त्याचे बहुतेक शो हाऊसफुल असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद होती. प्रेक्षक चित्रपटगृहाकडे फिरकत नसल्यामुळे चित्रपट निर्माते चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करत आहेत यामुळे चित्रपटगृहाचे मालक चांगलेच वैतागले आहेत आणि त्यांना मोठ्या नुकसानाला सोमोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी थेएटर्स मालकांनी सलमानला पत्र लिहून राधे चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याची विनंती केली होती. अखेर सलमान खान त्याच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

सोशल मीडियावर सलमानने जाहीर केलेले आहे की, त्याचा आगामी चित्रपट राधे चित्रपटगृहात प्रदर्शित करणार आहे. सलमानने लिहिले की, ‘सॉरी … मला सर्व चित्रपटगृहांच्या मालकांकडे लक्ष देण्यास वेळ लागला आणि मी एक मोठा निर्णय घेतला आहे त्यांची आर्थिक समस्या मी समजू शकतो.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

यामुळे मी माझा आगामी चित्रपट राधे हा चित्रपटगृहात प्रदर्शित करून त्यांना मदत करणार आहे. सलमानने चित्रपटगृहांच्या मालकांना सांगितले की, चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची सर्व काळजी त्यांनी घ्यावी. यंदा ईदवर राधे चित्रपट सर्वच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात सलमानसोबत मुख्य भूमिकेत दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा असतील. चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता.