सई ताम्हणकरच्या एन्ट्रीने ‘समांतर-२’मध्ये आणले नवे ग्लॅमर, दुसरा सिझनही ठरणार सुपरहिट!

गेली तीस वर्षे मनोरंजनाच्या दुनियेत व्यतीत केलेल्या स्वप्निल जोशी यांनी ‘समांतर’चा दुसरा सिझन याआधीचे सर्व विक्रम मोडीत काढेल असे म्हटले आहे.

  पहिल्या पर्वाला अतुलनीय असे यश मिळाल्यानंतर आणि प्रेक्षकांकडून विक्रमी हिट्स प्राप्त झाल्यानंतर ‘समांतर-२’ या मराठी वेब सिरीजचा दुसरा सिझन दाखल झाला आहे. या दुसऱ्या पर्वामध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये प्रेक्षकांसाठी दाखल केली गेली आहेत. नितीश भारद्वाज आणि स्वप्नील जोशी, तेजस्वीनी पंडित यांनी या मालिकेमध्ये दर्जेदार रंग भरले आहेत पण या मालिकेच्या दुसऱ्या पर्वामध्ये सई ताम्हणकर आल्याने या मालिकेमध्ये वेगळीच जान आणि ग्लॅमर प्राप्त झाले आहे. या वेब सिरीजची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या जीसिम्स (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अंड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड) या आघाडीच्या कॉन्टेंट निर्मिती कंपनीने केली आहे.

  ‘समांतर’च्या पहिल्या पर्वाला तब्बल २०० दशलक्ष प्रेक्षकसंख्या मिळाली. या पर्वाची खूप वाहवा झाली आणि पुरस्कार मिळाले. त्यांमध्ये ई4एम अॅवार्ड्समधील ‘सर्वोत्तम प्रादेशिक वेब सिरीज मालिका’ पुरस्काराचा समावेश आहे. दुसऱ्या पर्वामध्ये अधिक मोठ्या प्रमाणवर थ्रील असणार आहे कारण या पर्वामध्ये कुमारचा परिस्थितीशी झगडा तर सुरु राहणारच आहे पण त्याचबरोबर या पर्वालासई ताम्हणकरच्या ग्लॅमरचा तडका मिळाला आहे. या सीझनमध्ये स्वप्निल आणि नितीश हे एकमेकांसमोर असल्याने त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी रसिकांना अनुभवता येणार आहेच. मालिकेमध्ये भारद्वाज यांनी सुदर्शन चक्रपाणीची भूमिका अशी काही रंगविली आहे की प्रेक्षक तिच्या प्रेमात पडतात. स्वप्निल जोशी या मालिकेमध्ये कुमार महाजनच्या भूमिकेमध्ये आहे. सुदर्शन चक्रपाणीने कुमारचे आयुष्य आधीच जगले आहे.

  ‘समांतर’ या वेबसिरीजच्या माध्यमातून अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ने वेब सिरीज क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘एमएक्स प्लेयर’च्या माध्यमातून ‘ओव्हर-द-टॉप’ व्यासपीठावरून ही मालिका प्रसारित झाली. स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांनी या मालिकेत महत्वाच्या भूमिका पार पडल्या आहेत. त्या दोघांचीही ही पहिलीच वेब सिरीज होती. पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते तर दुसरे पर्व समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केले आहे. ही मालिका केवळ ‘एमएक्स प्लेयर’वर उपलब्ध आहे.

  सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सिरीज बेतली आहे. यातील कुमार महाजनला एके दिवशी कळते की त्याचे आयुष्य हे सुदर्शन चक्रपाणी आधीच जागून गेला आहे. तो मग त्याच्या भविष्यामध्ये काय लिहिले आहे, याचा शोध घेवू लागतो. दुसऱ्या पर्वामध्ये नितीश भारद्वाज आणखी एका प्रमुख भूमिकेमध्ये असून त्याबद्दल रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. स्वप्निल जोशीच्या पहिल्या पार्वतील व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची आणि त्याच्या चाहत्यांचीही माने जिंकली होती.

  गेली तीस वर्षे मनोरंजनाच्या दुनियेत व्यतीत केलेल्या स्वप्निल जोशी यांनी ‘समांतर’चा दुसरा सिझन याआधीचे सर्व विक्रम मोडीत काढेल असे म्हटले आहे. निर्मात्यांनी जी निर्मितीमूल्ये जपली आहेत, त्यामुळे ही एक उच्च दर्जाची मालिका झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. “अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्याबरोबर त्यांच्या ‘जीसिम्स’शी मी गेली कित्येक वर्षे जोडला गेलो आहे. या कंपनीशी आणि या दोघांशी माझे भावनिक बंध जोडले गेले आहेत.हे दोघे आणि त्यांची कंपनी दर्जा आणि नवीन गोष्टी यांची नेहमी कदर करतात. कंपनी कधीही दर्जाच्या बाबतीत तडजोड करत नाही आणि नवीन संकल्पनांचासुद्धा ते खुलेपणाने स्वीकार करतात.ते आपल्या कलाकारांना संपूर्ण स्वातंत्र्य देतात आणि त्यांच्यातील प्रतिभा पूर्ण खुलेल याकडे लक्ष देतात. हीच बाब दुसऱ्या पर्वामध्ये शाबित झाली असून मला पूर्ण खात्री आहे की हा दुसरा मोसम सर्वाधिक हीट ठरेल,”असेही स्वप्निल जोशी म्हणाले.

  आपल्या ‘समांतर-२’मधील भूमिकेबद्दल बोलताना स्वप्निल जोशी म्हणाले, “या उद्योगामध्ये एवढी वर्षे घालविल्यानंतर मला वाटते मी आता अशा वळणावर उभा आहे जिथे मी थोडीशी संधी घेऊ शकतो आणि प्रयोग करू शकतो. मला आता तोलून-मापून जोखीम घेणे शक्य आहे. मराठी चित्रपटांमधील नवीन प्रकार हाताळण्यासाठी मी फार उत्सुक आहे. ही माझ्या कारकीर्दीचा उत्तम असा टप्पा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी एका नव्या टप्प्याला सुरुवात केली असून मी सध्या असे सिनेमे किंवा प्रयोग करत आहे,जे मला लोक करू नको म्हणून सांगत आहेत. माझ्या इमेजमधून बाहेर पडण्याचा हा माझा प्रयत्न आहे. लोक मला सांगतात की मी चॉकलेट हिरो म्हणून यशस्वी झालो आहे आणि मी त्याच भूमिका करत राहिले पाहिजे. मला स्वतःलाच आव्हान द्यायचे आहे. मला ‘समांतर’सारख्या गोष्टी करायच्या आहेत. मला ‘समांतर’ने जे प्रेम आणि आदर दिला आहे तो मला वाटते दहा रोमॅन्टीक चित्रपटांनीही दिला नसता.”

  स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज हे दोघेही त्यांनी काही दशकांपूर्वी दोन भिन्न मालिकांमध्ये साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकांसाठी घराघरात ओळखले जातात. नितीश यांनी बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये (१९८८) कृष्णाची भूमिका साकारली होती तर स्वप्निल जोशींनी रामानंद सागर यांच्या ‘कृष्ण’ (१९९३) मालिकेत ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती.

  मराठी प्रेक्षक हा दर्जेदार साहित्याचा दर्दी असतो आणि अशा प्रेक्षकांसाठी तयारी केलेली ही पाहिली मराठी वेब सिरीज आहे. ‘समांतर’ ही मराठीमधील अद्वितीय अशी ही वेब सिरीज आहे. मालिकेच्या पहिल्या भागात मराठी उद्योगामधील आघाडीचे कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये होते. पहिल्या मोसमामध्ये आम्ही अतुलनीय असे यश कमावले आहे. दुसऱ्या सिझनमध्ये आम्ही अधिक मोठी कलाकारांची फळी घेवून आलो आहोत. आम्ही वैविध्यपूर्ण अशा विषयांवर आणखीही अशा मालिका भविष्यात बनविणार आहोत,” असे उद्गार ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांनी काढले.

  दिग्दर्शक समीर विद्वांस म्हणाले, “समांतर’ ही एक नाट्यमय मालिका असून या संपूर्ण सीझनमध्ये रहस्यमय आणि गूढ घटना घडत राहतात. ही मालिका सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या दर्जेदार कथानक असलेल्या कादंबरीवर बेतली आहे. मूळ मराठी भाषेतील ही वेब मालिका नंतर हिंदी, तेलगु तसेच तमिळ या भाषांमध्ये भाषांतरित झाली. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, मालिकेचा दुसरा सिझन हा पहिल्यापेक्षाही उत्तम असेल. मला ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांचे त्यांनी आम्हाला या मालिकेच्या संकल्पना तसेच तिच्या निर्मितीच्या टप्प्यांवर जे स्वातंत्र्य दिले त्यासाठी आभार मानायचे आहेत.”

  ‘जीसिम्स’ने अनेक भाषांमध्ये कित्येक हिट चित्रपट दिले आहेत. मोगरा फुलला, फुगे, तुला कळणार नाही, रणांगण, विकी वेलिंगकर, बोनस,बळी अशा मराठी चित्रपटांची निर्मिती कंपनीने केली आहे. खिळवून ठेवणाऱ्या विषयांवर आधारित कलाकृतींची निर्मिती करण्यासाठी ओळखली जाणारी ही कंपनी म्हणजे महाराष्ट्रातील तो एक आघाडीचा स्टुडीओ आहे. कंपनीने चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही निर्मिती आणि सॅटेलाईट एकत्रीकरण या क्षेत्रांमध्ये काम केले आहे.