समंथाच्या या Video वर कमेंट करण्याचा मोह सेलेब्रेटींनाही आवरला नाही, विकी कौशलनेतर शेअरही केला तीचा व्हिडिओ!

काही दिवसांपूर्वीच विक्की कौशलने या चॅलेंजमध्ये भाग घेत त्याच्या टीमसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. दिया मिर्झा, रकुल प्रित यांच्यासह अनेक बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटींनी समंथाचं कौतुक केलंय.

  अभिनेत्री समंथा अक्किने सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असत. ती सतत आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. समंथाचे लाखो फॉलोवर्स आहेत. नुकताच समंथाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय.

  समंथाने सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या ‘डोन्ट रश’ चॅलेंज केलाय. हा व्हिडीओ तीने सोशल मीडियावर शेअर केलाय. डिजिटल कंटेंट क्रिएटर अनुषा स्वामी हिच्यासोबत समंथाने जबरदस्त डान्स केल्याचं या व्हिडीओत पहायला मिळतंय. समंथाने तिच्या डान्सचा व्हिडीओ पोस्ट करताना कमेंटमध्ये विक्की कौशलचा उल्लेख केलाय. ” विक्की कौशलने आम्हाला हे करण्यास भाग पाडलं” असं तिने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे.

   

  काही दिवसांपूर्वीच विक्की कौशलने या चॅलेंजमध्ये भाग घेत त्याच्या टीमसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. दिया मिर्झा, रकुल प्रित यांच्यासह अनेक बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटींनी समंथाचं कौतुक केलंय. तर अनेक चाहत्यांनी समंथाच्या डान्सला पसंती दिलीयं. विकीने देखील समंथाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. समंथा फिटनेस प्रेमी असून बऱ्याचदा वर्कआउटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

   

  २०१७ सालात समंथाने अभिनेता नागा चैतन्या याच्याशी विवाह केला आहे. ती लोकप्रिय अभिनेता नागार्जुन यांची सून आहे. समंथाने अनेक तेलगू आणि तमिळ सिनेमांमधून चाहत्यांची मनं जिकंली आहेत. ‘फॅमिली मॅम-२’ या वेब सीरिजमधून समंथा हिंदी अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.