हॉस्पिटलने माझ्या वडिलांचे हात पाय  बेडला बांधून ठेवले होते, अभिनेत्रीने पाठवली रूग्णालयाला नोटीस!

“माझे वडील कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ४ दिवसांनी ३० एप्रिल रोजी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथल्या मेडिकल स्टाफने त्यांच्या रक्ताची चाचणी केली आणि लवकरच ते बरे होतील, असं देखील सांगितलं होतं.

    काही दिवसांपूर्वीच बिग बॉसची एक्स कंटेस्टंट संभावना सेठच्या वडिलांचे हृद्यविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागणी झाली होती. त्यांना रूग्णालयात बेड मिळत नसल्याची पोस्ट संभावनाने सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर काही दिवसातच नवी दिल्लीतल्या एका रूग्णालयात उपचार सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. आता संभावनाने रूग्णालयाचा कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तिचे वडिल कोरोना पॉझिटिव्ह आलेच नसून तिच्या वडिलांच्या ‘मेडिकली मर्डर’ साठी रूग्णालातील कर्मचारीच दोषी असल्याचा दावा संभावनाने केलाय.

    व्हिडिओ केला होता शेअर

    संभावना सेठने काही दिवसांपूर्वीच तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिने तिच्या वडिलांच्या मृत्यूला ‘मेडिकल मर्डर’ दाखवत यासाठी रूग्णालयाला जबाबदार ठरवलं होतं. त्यानंतर आता तिने यासंदर्भात रूग्णालयाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

    एका मुलाखती दरम्यान संभावना सेठ म्हणाली, “माझे वडील कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ४ दिवसांनी ३० एप्रिल रोजी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथल्या मेडिकल स्टाफने त्यांच्या रक्ताची चाचणी केली आणि लवकरच ते बरे होतील, असं देखील सांगितलं होतं. त्याच दिवशी जेव्हा भाऊ रूग्णालयात गेला तेव्हा वडिलांचे हात पाय बांधून ठेवल्याचं त्याने पाहिलं. याबाबत माझ्या भावाने रूग्णालयाकडे स्पष्टीकरण मागितलं तर तबाडतोब वडिलांचे बांधलेले हात पाय खुले केले. त्यावर रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं, वडिलांना स्वतःच्या हाताने सलाईन काढता येऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे हात पाय बांधले होते. त्यानंतर ७ मे रोजी माझ्या भावाने घाबरून मला कॉल केला आणि वडिलांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवलं असल्याचं सांगितलं.. मला यात काही तरी गडबड वाटली आणि तात्काळ नवी दिल्ली गाठली. माझ्या वडिलांचे हात पाय त्यांनी बेडला बांधले होते हे ऐकून मला धक्काच बसला. ते त्याचं ऑक्सिजन सप्लाय थांबवत होते म्हणून त्यांचे हात पाय बांधल्याचं तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. माझ्या वडिलांना हाताळण्यासाठी तिथे कुणीच कर्मचारी देखील नव्हते. मेडिकल सुविधा देखील निष्कृष्ठ दर्जाच्या होत्या. आता रूग्णालय या नोटीसीला काय उत्तर देतय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.