कोरोनाशी लढणाऱ्या जिगरबाज माणसांची कहाणी ‘समिधा’!

३२ मिनिटांच्या या माहितीपटात योगेश सोमण,  आस्ताद काळे, विक्रम गायकवाड, सिद्धी पोतदार यांच्यासह विविध कलाकार आणि कार्यकर्त्यांनी काम केलं आहे.

    लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकरनं आजवर ऐतिहासिक चित्रपटांना प्राधान्य दिलं आहे. शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करून त्यातील सुवर्णअध्याय मोठ्या पडद्यावर मांडणारा दिग्पाल आता ‘समिधा’ ही डॉक्युमेंट्र घेऊन आला आहे. ‘समिधा’मध्ये दिग्पालनं कोरोनाशी लढणाऱ्या जिगरबाज माणसांची कहाणी सादर केली आहे. नुकतंच या लघुपटाचं लोकार्पण डॉ. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं. 

    लातूर येथील विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक संचालक, पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रस्तुत `समिधा` हा माहितीपट राजश्री मराठी युट्यूब चॅनलवर पहायला मिळेल. ३२ मिनिटांच्या या माहितीपटात योगेश सोमण,  आस्ताद काळे, विक्रम गायकवाड, सिद्धी पोतदार यांच्यासह विविध कलाकार आणि कार्यकर्त्यांनी काम केलं आहे.

    आस्तादनं तरुणाईला मुख्य प्रवाहात आणून अशा सकारात्मक आणि विधायक उपक्रमांचा प्रसार करायला हवा असल्याचं मत व्यक्त केलं. दिग्पाल म्हणाला की, स्क्रिनिंगमध्ये पहिल्या लाटेत सहभागी झालो होतो. त्यामुळं अनेक गोष्टी जवळून पहिल्या,  अनुभवल्या होत्या. दुसऱ्या लाटेत हे काम संपूर्ण जगाला समजावं ही लघुपटाच्या निर्मितीची प्रेरणा असल्याचं स्पष्ट केलं.