समीरनं घेतलं किन्नरचं सोंग, आपल्या या नव्या भूमिकेबद्दल अक्षयने सांगितलं हे खास कारण!

पोलिस अक्षयच्या खुनाचे रहस्य उकलण्याचा जोरदार प्रयत्न करीत असून त्यांचा प्रमुख संशय लुथ्रा कुटुंबियांवर आहे. सुरुवातीला अक्षयच्या खुनाबद्दल प्रीताला जरी अटक करण्यात आली असली, तरी नंतर करणने या खुनाची जबाबदारी स्वत:वर घेतल्यामुळे कथानकाला नवे वळण प्राप्त झाले आहे.

    झी टीव्हीवरील ‘कुंडली भाग्य’ मालिकेने पहिल्यापासूनच आपल्या कथानकाला विविध कलाटण्या देऊन प्रेक्षकांना मालिकेत गुंतवून ठेवले आहे. गेल्या काही महिन्यांपासून करण (धीरज धूपर) आणि प्रीताच्या (श्रध्दा आर्य) जीवनातील नाट्यमय वळणांनी प्रेक्षकांमधील उत्सुकता सतत वाढवीत नेली आहे. मालिकेत अक्षयला (नवीन शर्मा) मृत म्हणून घोषित केल्यापासून कथानकाला अनेक नाट्यमय कलाटण्या मिळाल्या आहेत.

     पोलिस अक्षयच्या खुनाचे रहस्य उकलण्याचा जोरदार प्रयत्न करीत असून त्यांचा प्रमुख संशय लुथ्रा कुटुंबियांवर आहे. सुरुवातीला अक्षयच्या खुनाबद्दल प्रीताला जरी अटक करण्यात आली असली, तरी नंतर करणने या खुनाची जबाबदारी स्वत:वर घेतल्यामुळे कथानकाला नवे वळण प्राप्त झाले आहे. यानंतर लुथ्रा कुटुंबातील प्रत्येक सदस्य करण निर्दोष आहे, हे सिध्द करण्यासाठी आणि खर्‍या खुन्याचा शोध घेण्यासाठी पुराव्याचा शोध घेत आहे. आता प्रीता, सृष्टी (अंजुम फकीह) आणि समीर (अभिषेक कपूर) यांनी खर्‍या खुन्याला शोधून काढण्यासाठी वेगळीच शक्कल लढविली आहे.

    किन्नरांची व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी आणि एक अगदी वेगळे रूप घेतल्यावर आलेला अनुभव सांगताना अभिषेक कपूर म्हणाला की, सुरुवातीला मी जरी या व्यक्तिरेखेबद्दल थोडा साशंक होतो. प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद लाभेल असं आमच्या क्रिएटिव्ह टीमनं समजावून सांगितल्यावर किन्नरांची व्यक्तिरेखा करायला तयार झाल्याचं अभिषेक म्हणाला.