‘संदीप और पिंकी फरार’ ला प्रेक्षकांची पसंती, म्हणाले या वर्षातला हा सगळ्यात उत्कृष्ट चित्रपट!

‘संदीप और पिंकी फरार’ ही दोन वेगवेगळ्या व्यक्तींची कहाणी आहे, जे अचानक एकमेकांना भेटतात आणि त्यांचे आयुष्य हे एकमेकांशी जोडले जाते. पिंकीची भूमिका अर्जुनने साकारली आहे.

    कोरोनामुळे लागु करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेक चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतं आहेत. त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोपडा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचा बहुचर्चित ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २० मे रोजी प्रदर्शित झाला.

    ‘संदीप और पिंकी फरार’ ही दोन वेगवेगळ्या व्यक्तींची कहाणी आहे, जे अचानक एकमेकांना भेटतात आणि त्यांचे आयुष्य हे एकमेकांशी जोडले जाते. पिंकीची भूमिका अर्जुनने साकारली आहे. त्याचे संपूर्ण नाव हे पिंकेश दहिया आहे. पिंकेश हा हरयाणवी पोलिस अधिकारी आहे. कॉर्पोरेट जगात स्वत:चे स्वप्न पूर्ण करणारी संदीप कौरची भूमिका परिणीती साकारत आहे.

    हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होताच अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरलेला आहे. संदीप और पिंकी फरार हा २०२१ मधील सर्वात उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत.    अर्जुन, परिणीती आणि जयदीप अहलावतने उत्तम भूमिका साकारली आहे. वरुण ग्रोव्हर आणि दीपांकर सर यांनी या चित्रपटाची पटकथा उत्तम लिहिली आहे. संदीप और पींकी फरार हा चित्रपट १९ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मात्र, करोनाच्या निर्बंधांमुळे अनेकांना हा चित्रपट पाहता आला नाही.