अर्जून कपूरने दाबला परिणीती चोप्राचा गळा, Video सोशल मीडियावर व्हायरल!

पहिला ट्रेलर गेल्या वर्षी ४ मार्चला रिलीज झाला होता. मात्र लॉकडाऊनमुळे सिनेमाचा रिलीज पुढे ढकलावा लागला होता. अर्जुन आणि परिणितीचा हा एकत्र काम केलेला तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी 'इश्‍कजादे' आणि 'नमस्ते इंग्लंड'मध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते.

  अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्राचा संदीप और पिंकी फरार १९ मार्चला रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर अतिशय सस्पेन्सने भरलेला आहे. ट्रेलरबघूनच या चित्रपटाच्या कथेचा अंदाज येतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

   काय आहे ट्रेलरमध्ये

  सिनेमाच्या प्रॉडक्‍शन टीमने ट्रेलर सोशल मिडीयावर रिलीज केला. ट्रेलरमध्ये अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा एका रेल्वे स्टेशनवर दिसतात. पहिल्यापासूनच या दोघांमध्ये काही तरी तणाव असल्याचे लगेच लक्षात येते.  परिणितीला मारण्याचा प्रयत्न सतत अर्जुन कपूर करत असतो. त्याचबरोबर तिला सतत सीमेबाहेर नेण्याचीही भाषा तो करत असतो. या ट्रेलरच्या अखेरीस अर्जुन कपूर चक्क परिणितीचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करत असताना दिसतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

  पहिला ट्रेलर गेल्या वर्षी ४ मार्चला रिलीज झाला होता. मात्र लॉकडाऊनमुळे सिनेमाचा रिलीज पुढे ढकलावा लागला होता. अर्जुन आणि परिणितीचा हा एकत्र काम केलेला तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी ‘इश्‍कजादे’ आणि ‘नमस्ते इंग्लंड’मध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते.