sanjay dutt

अभिनेता संजय दत्त कॅन्सरमुक्त(sanjay dutt free from cancer) झाला आहे. ट्विट करत त्याने ही माहिती दिली आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करताना ही आनंदाची बातमी त्याने दिली आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते.

अभिनेता संजय दत्त कॅन्सरमुक्त(sanjay dutt free from cancer) झाला आहे. ट्विट करत त्याने ही माहिती दिली आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करताना ही आनंदाची बातमी त्याने दिली आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. संजय दत्तने ११ ऑगस्ट रोजी या संदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती.

“गेले काही आठवडे माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. पण असं म्हणतात ना, देव सर्वात ताकदवान सैनिकालाच सर्वात कठीण लढाई लढायला लावतो. आज, माझ्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशीच, मी या लढाईवर विजय मिळवला आहे. मला फार आनंद झाला आहे”, असे संजय दत्तने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. संजय दत्तने त्याच्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे देखील आभार मानले आहेत. ‘तुमच्या सर्वांच्या विश्वास आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते’ असे त्याने म्हटले आहे.

संजय दत्तने कोकिलाबेन रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचा उल्लेख करत त्यांचे आभार मानले आहेत.