adheera sanjay datt

कर्करोगावर मात केल्यानंतर अभिनेता संजय दत्त गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यग्र आहे. गेल्या महिन्यात त्यानं ‘ भूज : द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचं हैद्राबाद इथं शूटिंग केलं. आता याच शहरात संजय दत्त ‘केजीएफ2’ या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. संजय दत्त KGF 2 मध्ये व्हिलनचीच भूमिका साकारणार आहे. त्याच्या या भूमिकेचा क्लायमॅक्स सीन सध्या चित्रित होत आहे.

दाक्षिणात्य अभिनेता यश याची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, संजय दत्त या चित्रपटात ‘अधीरा’ ही खलनायकाची भूमिका साकारात आहे. नायकाची भूमिका साकारणाऱ्या यशबरोबर होणाऱ्या जीवघेण्या मारामारीच्या प्रसंगात त्याचा अंत होतो.

या दोन्ही क्लायमॅक्सचं शूट प्रशांत नील हे करत आहेत. दोन्ही अभिनेते हा अत्यंत महत्त्वाचा क्लायमॅक्सचा भव्य प्रसंग शूट करण्यासाठी सज्ज आहेत. नायक आणि खलनायक यांच्यातील अवघड स्टंटस असलेल्या या प्रसंगाचे शुटिंग सध्या टप्प्याटप्प्यात सुरू आहे.