संजय दत्तच्या मुलीनं केलं ब्रेकअप, 7 वर्षानंतर तोडलं नातं… सोशल मीडियावर ते कारण होतय व्हायरल!

त्रिशला ने या प्रश्नावर उत्तर देत लिहीलं, “७ वर्षे... मी जास्त खोलात नाही जाणार की का आम्ही वेगळे झालो. पण हे सांगू शकते की आम्ही वेगवेगळ जीवन जगू इच्छित होतो. त्यामुळे आम्ही एकत्र मिळून हा निर्णय घेतला.

    अभिनेता संजय दत्तची मुलगी बॉलिवूडमध्ये नसली तरी ती सतत चर्चेत असते. पण सोशल मीडियावर ती सक्रिय असते.  नुकताच त्रिशलाने तिच्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला आहे. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांच ब्रेकअप झालं. त्रिशलाने स्वताच या गोष्टीचा खुलासा केला.

    नुकताच त्रिशलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर एक चॅट सेशन केला होता. त्यात तिच्या चाहत्यांनी तिला काही प्रश्न विचारले होते आणि त्रिशलाने त्यांची उत्तरं ही दिली होती. यावेळी एका युझरने त्रिशलाला तिच्या लाँग टाइम रिलेशनशीप विषयी विचारल, तेव्हा त्रिशला ने उत्तर दिलं की जवळपास सात वर्षे आमचं डेटींग सुरू होत. पण आता त्यांचं ब्रेकअप झालं आहे.

    त्रिशला ने या प्रश्नावर उत्तर देत लिहीलं, “७ वर्षे… मी जास्त खोलात नाही जाणार की का आम्ही वेगळे झालो. पण हे सांगू शकते की आम्ही वेगवेगळ जीवन जगू इच्छित होतो. त्यामुळे आम्ही एकत्र मिळून हा निर्णय घेतला. तो त्यावेळी जे आयुष्य जगू इच्छित होता त्यासाठी मी तयार नव्हते. आम्हा दोघांमध्ये खूप अंतर होतं जे काळानुसार समोर येत गेलं.”

    त्रिशला दत्त हि संजय दत्तच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. आई रिचा शर्मा हिच्या निधनानंतर ती आपल्या आजी आजोबांसोबत अमेरिकेत असते. चित्रपटसृष्टीशी तिचा काहीही संबध नसला तरीही सोशल मीडिया वर तिचे भरपूर फॉलोवर्स आहेत.