अभिनेता रणबीर कपूरनंतर संजय लीला भन्साळींना कोरोनाची लागण, आलियाने घेतला महत्त्वाचा निर्णय!

संजय लीला भन्साळी हे गेले काही दिवस गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. त्याचबरोबर नुकताच त्यांनी आपला वाढदिवसही साजरा केला होता. आता निर्मात्यांनाच कोरोनाची लागण झाली असल्यामुळे चित्रपटाच चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे.

    अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली ही बातमी ताजी झाली ही बातमी ताजी असतानाच बॉलिवूडमधून आणखी एक नाव समोर आलं आहे. प्रसिध्द चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळींना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

    संजय लीला भन्साळी हे गेले काही दिवस गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. त्याचबरोबर नुकताच त्यांनी आपला वाढदिवसही साजरा केला होता. आता निर्मात्यांनाच कोरोनाची लागण झाली असल्यामुळे चित्रपटाच चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे.

    बॉलिवूड हंगामाच्या बातमीनुसार, संजय लीला भन्साळी यांनी नुकतीच स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली, तेव्हा ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तसेच, संजय लीला भन्साळी क्वारंटाईन झाले आहेत. आता निर्मात्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर, या चित्रपटाशी संबंधित इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी केली जाईल. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.