संक्रांती निमित्त शुभ्रा चा लेडीज डे आऊट, आसावरी चा हटके लूक, मालिकेत संक्रांतीनिमित्त नवं वळण!

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत आसावरी आणि अभिजित यांची पहिली संक्रांत साजरी होणार आहे, त्यासाठी खास चित्रीकरण करण्यात आलं हलव्याचे दागिने घालून नटलेली आसावरी ह्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुभ्रा लेडीज डे आऊट साठी सगळ्या बायकांनी मिळून मज्जा करण्याचा प्लॅन ठरवते आणि सगळ्याजणी पार्लरमध्ये जातात, वेगळ्या रुपात आलेल्या आसावरीला पाहून अभिजीत अवाक होतो! तो सरप्राईज म्हणून तिच्यासाठी बाईक घेऊन येतो.

आई, सून, सासू आणि बायको हि प्रत्येक भूमिका चोख बजावणारी आसावरी महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनली. एकंदरीत काय तर ‘सासूबाई’ प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत असं म्हंटल तरी खोटं ठरणार नाही.

aagbai sasubai 2

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत आसावरी आणि अभिजित यांची पहिली संक्रांत साजरी होणार आहे, त्यासाठी खास चित्रीकरण करण्यात आलं हलव्याचे दागिने घालून नटलेली आसावरी ह्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुभ्रा लेडीज डे आऊट साठी सगळ्या बायकांनी मिळून मज्जा करण्याचा प्लॅन ठरवते आणि सगळ्याजणी पार्लरमध्ये जातात, वेगळ्या रुपात आलेल्या आसावरीला पाहून अभिजीत अवाक होतो! तो सरप्राईज म्हणून तिच्यासाठी बाईक घेऊन येतो.

aagbai sasubai 3

इकडे चाळीत पतंग उडवण्याची स्पर्धा लागते. सगळे उत्साहाने स्पर्धेत सामील होतातं. वयापेक्षा मनानं तरुण असणं महत्त्वाचं हे अभिजीत सिद्ध करतो. शेवटी एक फॅमिली फोटो घेतला जातो ज्यातून सोहम हळूच काढतां पाय घेतो. पण शुभ्रा त्याला थांबवते. आसावरी तो फोटो पाहून नाराज होत नाही हे बघून सोहमला बरं वाटतं.  इकडे शुभ्राने ठरवलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी, सोहम शुभ्राला आईसोबत सण साजरा कर असा सांगतो. पाहायला विसरू नका ‘अग्गबाई सासूबाई’