sapna choudhary

सपना चौधरीने नुकतीच(Sapna Choudhary Announced The Name Of His Son) आपल्या मुलाच्या नावाची घोषणा केली आहे. तिच्या मुलाच्या नावाची सध्या खूप चर्चा सुरु आहे.

  हरियाणातील गायिका आणि नृत्यांगना सपना चौधरी(Sapna Choudhary) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.सपना चौधरीला सोशल मीडियावर(Sapna Choudhary On Social Media) खूप फॉलोअर्स आहेत. सपनाचे फोटो आणि व्हिडिओ कायम प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असतात. सध्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे सपना चौधरी चर्चेत आहे. सपना चौधरीने नुकतीच(Sapna Choudhary Announced The Name Of His Son) आपल्या मुलाच्या नावाची घोषणा केली आहे. तिच्या मुलाच्या नावाची सध्या खूप चर्चा सुरु आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

  सपना चौधरीने सोशल मीडियावर एक पोस्टद्वारे आपल्या मुलाच्या नावाची घोषणा केली आहे. सपनाने लिहिले आहे की, “तू जरी सामान्य घरामध्ये जन्माला आला असलास तरी मला विश्वास आहे की तू सर्वसामान्य नाहीस. लोकांच्या नजरा खूप वाईट आहेत म्हणून ते समोर नाहीत. या दुनियेत तुला आणण्याचं आम्ही एक माध्यम आहोत. तू या मातीचा सूपुत्र आहेस. ज्या राजाने तैमूरपासून सिकंदरपर्यंत अनेकांना टक्कर दिली आहे त्याचं नाव तुला देत आहे. तुझं नाव आम्ही ‘पोरस’ ठेवलं आहे. माझ्याकडून आणि माझ्या चाहत्यांकडून माझ्या बछड्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा @पोरस.”

  सोशल मीडियावर सपना चौधरीच्या व्हिडिओची आणि तिने ठेवलेल्या मुलाच्या नावाची सध्या खूप चर्चा सुरु आहे. करिना कपूरच्या मुलांच्या तैमूर आणि जहाँगीर या नावांनंतर सपना चौधरीच्या मुलाच्या नावाबद्दल चर्चा सुरू आहे.