मायलेकींची ऑफस्क्रीन केमिस्ट्री आता दिसणार ऑनस्क्रीन, सारा आणि आई अमृताचा फोटो व्हायरल!

सध्या बरेच आघाडीचे ब्रँड साराच्या पर्समध्ये आहेत. यात ममाअर्थ या आणखी एका ब्रँडचा समावेश झाला आहे. याच ब्रँडसाठी मायलेकींनी एकत्र काम केलं आहे.

  ‘केदारनाथ’ या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतसोबत जोडी जमवत बॉलिवूडमध्ये दाखल झालेल्या सारा अली खाननं अल्पावधीतच आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. चित्रपटांच्या प्रमोशनसोबतच सारा आपल्या सोशल मीडियाचा वापर फॅमिली फोटोज आणि व्हिडीओज शेअर करण्यासाठीही करते. कित्येकदा ती आई अमृता सिंगसोबतचे फोटोही शेअर करते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

  नुकताच तिनं आई डोक्याला मसाज करत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. योगायोग माय-लेकी प्रथमच ऑनस्क्रीन एकत्र आल्या आहेत. दोघींनीही एखाद्या चित्रपटासाठी किंवा वेब सिरीजसाठी नव्हे, तर एका जाहिरातीसाठी स्क्रीन शेअर केली आहे. सध्या बरेच आघाडीचे ब्रँड साराच्या पर्समध्ये आहेत. यात ममाअर्थ या आणखी एका ब्रँडचा समावेश झाला आहे. याच ब्रँडसाठी मायलेकींनी एकत्र काम केलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

  विशेष म्हणजे या जाहिरातीद्वारे अमृता सिंग यांनी ३० वर्षांच्या प्रदीर्घ ब्रेकनंतर जाहिरात विश्वात पुनरागमन केलं आहे. काही असो, पण या निमित्तानं का होईना रिअल लाईफमधील मायलेकी पहिल्यांदा एकत्र दिसल्या आहेत.