‘कुली नंबर २’ नंतर सारा दिसणार होती ‘या’ चित्रपटात, पण ड्रग्ज प्रकरणामुळे साराची चित्रपटातून हकालपट्टी

नवाब सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सध्या आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. मात्र गेले काही दिवसती बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आली होती. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणानंतर अनेक सेलेब्रेटींची नावं या ड्रग्ज प्रकरणात पुढे आली. अर्जुन रामपाल, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, भारती सिंह,दीपिका पदुकोण, आणि सारा यासगळ्यांची आत्तापर्यंत एनसीबीकडून चौकशीही करण्यात आली.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

अनेक नामांकित कलाकारांसोबतच साराचं देखील नाव जोडलं गेलं होतं. मात्र तिच्याविरोधात कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे एनसीबीनं तिला निर्दोष मुक्त केलं. परंतु या ड्रग्जच्या आरोपांचा फटका तिच्या फिल्मी करिअरला बसला आहे. ‘हिरोपंती २’ या आगामी चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘हिरोपंती’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बिग बजेट चित्रपटासाठी अभिनेत्री सारा अली खानची निवड करण्यात आली होती. परंतु बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार ड्रग्ज प्रकरणात तिचं नाव समोर आल्यामुळे या प्रोजेक्टमधून तिला काढण्यात आलं. तिच्यामुळे चित्रपटाची नकारात्मक प्रतिमा प्रेक्षकांसमोर सादर होऊ शकते अशी भीती निर्मात्यांना वाटत आहे त्यामुळे साराऐवजी आता दुसऱ्या एखाद्या अभिनेत्रीची या चित्रपटासाठी निवड केली जाण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)