अंतवस्त्राची साइज विचारणाऱ्या चाहत्याला अभिनेत्रीने लाइव्ह सेशनमध्येच दिलं उत्तर, म्हणाली…

सायंतनीने पोस्ट शेअर लिहिले आहे की, खरच साइज जाणून घेतल्याने काही फरक पडतो का? पुढे तिने बॉडी शेमिंग करणाऱ्यांना सुनावले आहे

    लोकप्रिय अभिनेत्री सायंतनी घोष सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिच्याप्रमाणे अनेक कलाकार सतत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. पण कधीकधी त्यांना त्यांच्या कामावरुन,  वजनावरुन,  कपड्यांवरुन ट्रोल केलं जातं. असेच काहीसं सायंतनीबरोबर घडलं आहे.  इन्स्टाग्राम लाइव्ह दरम्यान सायंतनीला एका यूजरने तिच्या अंतर्वस्त्रांची साइज विचारली होती. त्यानंतर तिने त्या यूजरला चांगलेच सुनावले होते.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sayantani (@sayantanighosh0609)

    सायंतनीने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.  सायंतनीने पोस्ट शेअर लिहिले आहे की, खरच साइज जाणून घेतल्याने काही फरक पडतो का? पुढे तिने बॉडी शेमिंग करणाऱ्यांना सुनावले आहे. ‘मानसिक विचारांच्या साइजला बदलायला हवे. प्रत्येक बॉडी टाइपला नॉर्मलाइज करण्याची वेळ आली आहे. या बदलत्या विचारांना मी पाठिंबा देत आहे. तुम्ही देताय का?’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sayantani (@sayantanighosh0609)

    सायंतनीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या सायंतनी ‘तेरा यार हूं मै’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. तसेच तिने एकता कपूरच्या ‘नागिन ४’मध्ये देखील काम केले आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sayantani (@sayantanighosh0609)