अंगद बेदी : माझ्या मुलीने खऱ्या आयुष्यातील नायिकांकडून प्रेरणा घ्यावी!

अंगद म्हणतो की, सानिया मिर्झा असो की सायना नेहवाल किंवा दुती चंद, सगळ्यांनी आपल्या संबंधित खेळांमध्ये आपल्या यशाने भारताला गौरवान्वित केले आहे. त्याचवेळी, दुसऱ्या बाजूला दीपिका पादुकोण आहे, जी केवळ एक विश्व प्रसिद्ध अभिनेत्रीच नाही, तर भारतात मानसिक आरोग्याविषयी जागृती करणारी अग्रदूत देखील आहे.

जवळपास दीड वर्षांपूर्वी नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांच्या घरी एका गोड मुलीचा जन्म झाला. नुकत्याच एका इंटरव्यू दरम्यान, अंगद बेदीने म्हणाला कि, त्याच्या मुलीने खऱ्या आयुष्यातील नायिका, जशा कि गुंजन सक्सेना, दुती चंद, सानिया मिर्झा, सायना नेहवाल आणि दीपिका पादुकोण यांच्याकडून प्रेरणा घ्यावी. अभिनेत्याने या विषयी बोलताना सांगितले कि, या त्या व्यक्ती आहेत ज्यांनी त्याच्या जीवनाला प्रेरित केले आहे आणि या प्रेरणेला तो आपल्या मुलीपर्यंत पोहोचवू इच्छितो. त्याला वाटते की त्याच्या मुलीने तिच्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात यांच्यासारखेच उत्कृष्ट कार्य करावे. 

अंगद म्हणतो की, सानिया मिर्झा असो की सायना नेहवाल किंवा दुती चंद, सगळ्यांनी आपल्या संबंधित खेळांमध्ये आपल्या यशाने भारताला गौरवान्वित केले आहे. त्याचवेळी, दुसऱ्या बाजूला दीपिका पादुकोण आहे, जी केवळ एक विश्व प्रसिद्ध अभिनेत्रीच नाही, तर भारतात मानसिक आरोग्याविषयी जागृती करणारी अग्रदूत देखील आहे. ती अशा नायकांमधील एक आहे जिने आपल्या अभूतपूर्व कामाने भारताला वैश्विक नकाशावर चमकवले आहे.  या करणांमुळे अंगद बेदीला वाटते की त्याच्या मुलीने मोठी होताना अशा खऱ्या आयुष्यातील नायिकांकडून प्रेरणा घ्यावी. या अशा महिला आहेत ज्यांनी आपल्याला जगाच्या नकाशावर आणले आहे आणि आपल्याला वैश्विक ओळख मिळवून दिली आहे.