पार्टीचा नवाबी थाट!! करीनाच्या घरच्या ख्रिसमस पार्टीचे फोटो पाहायचे आहेत का…

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने सैफ अली खान, तैमूर आणि कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. तसेच जवळच्या मित्रांसाठी डिनर पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये सोहा अली खान, कुणाल खेमू, नताशा पुनावाला, करिश्मा, इब्राहीम उपस्थित होते.

मुंबई : संपूर्ण बॉलिवूड आज नाताळचा सण जल्लोषात साजरा करत आहेत. अशाच एका अभिनेत्रीने देखील आपल्या घरात ख्रिसमस साजरा केला असून त्याची पार्टी देखील दिली आहे. ती अभिनेत्री म्हणजे करीना कपूर. करीनाने आपल्या मित्र-परिवारांसोबत ख्रिसमस साजरा केला असून त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरलं केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने सैफ अली खान, तैमूर आणि कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. तसेच जवळच्या मित्रांसाठी डिनर पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये सोहा अली खान, कुणाल खेमू, नताशा पुनावाला, करिश्मा, इब्राहीम उपस्थित होते.

पार्टीमध्ये करीना-सैफचा मुलगा तैमूरदेखील एन्जॉय करताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी आणि तिच्या चाहत्यांनी करीनाच्या फोटोजला भरपूर पसंती दर्शवली आहे. या फोटोमध्ये सगळ्यांनी सेंटाची टोपी घातली आहे. करीनाने सर्वांना ख्रिसमसच्या भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.

करीना कपूर गरोदर अवस्थेत असून सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड अक्टिव्ह असते. आता आगामी वर्षात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. करीनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, करिनाने आपल्या कामावर आणि सोशल लाइफवर कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही.