milind soman

अभिनेता मिलिंद सोमण यांचा सध्या एक वेगळा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. मिलिंदचा हा लूक बघून चाहते बुचकळ्यात पडलेत. या आधी आपल्या न्यूड फोटोमुळे मिलिंद सोमण चर्चेत आला होता. लवकरच मिलिंद सोमण ‘पौरषपुर’ या वेब शोमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये तो एक वेगळ्या भुमिकेत असेल. या वेब शोमधील कलाकरांचे फर्स्ट लूक प्रदर्शित झाले आहेत..त्यातील मिलिंद सोमणचा लूक चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by ALTBalaji (@altbalaji)

आल्टबालाजीने मिलिंदचा फर्स्ट लूक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिलिंद शर्टलेस आहे. पण त्याच्या नाकातली नोज रिंग सगळ्यांच लक्ष वेधून घेतेय. तर मिलिंदने कपाळावर कुंकू लावलय..पण दरवेळीप्रमाणे चाहत्यांना त्याचा हा लूकही आवडला आहे.  मिलिंदला वेगळ्या लूकमध्ये पाहून नेटकरी फिदा झाले आहेत. त्यांनी त्याच्या लूकवर कमेंट आणि लाइकचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

‘पौरषपुर’ या वेब शोमध्ये मिलिंद सोमणसोबत अभिनेत्री शिल्पा शिंदे, शाहीर शेख, साहिल सलाथिया आणि अन्नू कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या शोचे दिग्दर्शन सचिंद्र वत्स हे करत आहेत. हा शो अल्टबालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून लवकरच शोचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)