येत्या ४ महिन्यांमध्ये डिझनी प्लस हॉटस्टारवर ७ चित्रपट होणार प्रदर्शित

लॉकडाऊन अनलॉक होत असले तरी सिनेमागृहे बंद असल्याने आणि अनेकजण घरीच आहेत. कदाचित हाच विचार करून डिझनी प्लस हॉटस्टारवर ७ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होते

 लॉकडाऊन अनलॉक होत असले तरी सिनेमागृहे बंद असल्याने आणि अनेकजण घरीच आहेत. कदाचित हाच विचार करून डिझनी प्लस हॉटस्टारवर ७ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होते मात्र आता ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर, डिझनी प्लस हॉटस्टारवर पाहण्याची संधी मिळणार आहे. 

या ७ चित्रपटांमध्ये सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’, अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’, आलिया भटचा ‘सडक २’, अभिषेक बच्चनचा ‘ बिग बुल’, विद्युत जामवाल यांचा ‘खुदा हाफीज’, कुणाल खेमूचा ‘लूटकेस’, अजय देवगणचा ‘भूज – द प्राईड ऑफ इंडिया’ यांचा समावेश आहे. जुलै ते ऑक्टोबरदरम्यान हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.