अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीराने चक्क आंब्याच्या झाडाला लटकून केला व्यायाम, व्हिडिओ पाहून लोकांनीही केला तिच्या फिटनेसविषयीच्या आवडीला सलाम

अभिनेता शाहिद कपूरची(Shahid Kapoor) पत्नी मीरा कपूरने(Meera Kapoor) तिच्या वर्कआऊटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  अभिनेता शाहिद कपूरची(Shahid Kapoor) पत्नी मीरा कपूर(Meera Kapoor) तिच्या फिटनेसबाबतील नेहमीच अलर्ट असते. ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वर्कआऊटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ(Meera Kapoor Fitness Video) टाकत असते. तिचा एक नवा वर्कआऊट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

  मीरा राजपूतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा हा वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम करताना करत असल्याचं दिसत आहे. मीरा स्वतःला फिट ठेवण्यासाठी किती मेहनत घेतेय हे या व्हिडीओमधून आपण पाहू शकतो. ती लटकत असलेल्या झाडाला आंबे मोठ्या प्रमाणात दिसून आले. याच झाडाखाली एका टेबलवर खाण्याचे पदार्थ देखील ठेवण्यात आल्याचं दिसून आलं.

  हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “काहीतरी नवं केलं आहे…कारणे देऊन चालणार नाहीत… ”

  परिस्थिती कोणतीही असो, पण फिटनेस महत्त्वाचा आहे, असं तिने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. मीरा कपूरच्या अनेक फॅन्सनी या व्हिडीओवर कमेंट करत तिच्या फिटनेस आणि सौंदर्याचं कौतूक केलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)


  याआधीसुद्धा मीरा कपूरने व्यायाम करतानाचे हेल्दी पदार्थांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावरून ती तिच्या फिटनेसचा किती विचार करते,हे आपल्याला जाणवते. सगळ्यांनी व्यायाम करावा यासाठी हे व्हिडिओ टाकून ती लोकांना प्रवृत्त करत असते.