shahrukh khan and deepika padukone

पठाण चित्रपटातील(Pathan Movie Shooting) गाण्याच्या चित्रीकरणासाठी शाहरुख खान आणि दिपिका पादुकोेण स्पेनला(Shahrukh Khan And Deepika Padukone Will Go To Spain) जाणार आहेत.

  अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone)यांच्या ‘पठान’ (Pathan) चित्रपटाचे शुटींग सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार पठाण चित्रपटातील(Pathan Movie Shooting) गाण्याच्या चित्रीकरणासाठी शाहरुख खान आणि दिपिका पादुकोेण स्पेनला(Shahrukh Khan And Deepika Padukone Will Go To Spain) जाणार आहेत.  सिद्धार्थ आनंद हे पठाण चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचा काही भाग स्पेनमध्ये शूट केला जाणार आहे. पठाणमधील एका गाण्याच्या चित्रीकरणाची तयारी सध्या स्पेनमध्ये सुरु आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

  सिद्धार्थ आनंद या चित्रपटासाठी स्पेनला जाण्यासाठी तयार आहेत. चित्रपटाच्या शूटिंगसाठी आवश्य परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या चित्रपटात उत्कृष्ट व्हीएफएक्स पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते सिद्धार्थ आनंद आणि आदित्य चोप्रा हे जागतिक दर्जाचा चित्रपट बनवणार आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

  या चित्रपटात दीपिका आणि शाहरुख खानसोबत जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत असेल. जॉन या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. जॉननं अलीकडेच यशराज स्टुडिओ मुंबईतच या चित्रपटाचे शूटिंग केलं.चित्रपटाच्या टीमनं आता परदेशात जाऊन चित्रपटाचं गाणं शूट करण्याचा निर्णय घेतला आहे.  या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता आशुतोष राणा आणि डिंपल कपाडियासुद्धा असेल.