बॉलिवूडमध्ये २८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाहरुख खानचे ट्विट, चाहत्यांचे मानले आभार

मुंबई: बॉलिवूडमध्ये २८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शाहरुख खानने रविवारी एक ट्विट केले आहे. आपल्या चाहत्यांचे त्याने २८ वर्षे प्रेम केेल्याबद्दल आभार मानले आहेत. शाहरूख खानने असे म्हटले आहे की,

मुंबई: बॉलिवूडमध्ये २८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शाहरुख खानने रविवारी एक ट्विट केले आहे. आपल्या चाहत्यांचे त्याने २८ वर्षे प्रेम केेल्याबद्दल आभार मानले आहेत. शाहरूख खानने असे म्हटले आहे की, चाहत्यांमुळे ईच्छा असलेल्या क्षेत्रामध्ये करिअर करता आले. तसेच या क्षेत्रात चाहत्यांमुळे टीकून असल्याचे शाहरुख खानने कबूल केलेे आहे.

टेलिव्हीजनपासून सुरुवात करून मोठ्या पडद्यावर झळकणाऱ्या शाहरुखचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. शाहरुखने ‘फौजी’ या टीव्ही मालिकेद्वारे १९८८मध्ये अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर १९८९मध्ये ‘सर्कस’ या मालिकेत शाहरूख खानने काम केले. राज कंवर यांच्या ‘दिवाना’ चित्रपटाद्वारे १९९२ मध्ये शाहरुखने बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. 

शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये २८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, व्यावसायिकतेपेक्षा मनोरंंजन करण्यासाठी काम करण्याची माझी इच्छा होती. त्यामुळे मी या क्षेत्रामध्ये करिअर करू शकलो. बरीच वर्षे टीकून राहू शकलो. यापुढेही असेच काम सुरु ठेवणार आहे. या ट्विटसोबत शाहरुखने नवा फोटोदेखील शेअर केला आहे. मनोरंजन करण्याची परवानगी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार, असे शाहरुखने सगळ्यांना उद्देशून म्हटले आहे.