शमिता शेट्टीने व्यक्त केल्या राकेश बापटबद्दलच्या भावना, म्हणाली….

शमिता शेट्टीने(Shamita Shetty  Shares Her Feeling About Rakesh) राकेश बापटबद्दल नक्की काय वाटतं हे सांगितलं आहे.

  बिग बॉस ओटीटी’(Bigg Boss OTT)मध्ये सध्या राकेश बापट आणि शमिता शेट्टी(Rakesh Bapat And Shamita Shetty) यांच्याविषयीच्या उलटसुलट चर्चा सुरु आहेत. राकेश आणि शमितामध्ये चांगलं नातं निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.अशातच शमिता शेट्टीने(Shamita Shetty  Shares Her Feeling About Rakesh) राकेश बापटबद्दल नक्की काय वाटतं हे सांगितलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Voot (@voot)

  वूटने शेअर केलेल्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या व्हिडीओत शमिताने नेहा भसीनसमोर तिच्या भावना व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओत नेहाने शमिताला तिला राकेश आवडतो का ? असा  प्रश्न विचारला आहे. यावर शमिता म्हणाली, “होय. आम्ही एकमेकांना पसंत करतो. तो प्रेमळ आहे. मात्र कधी कधी तो खूप गोंधळलेला वाटतो त्यामुळे मला त्रास होतो. कारण मी अजिबात कन्फ्यूज नाही आहे. मी जेव्हा एखादा निर्णय घेते तेव्हा मी त्यावर ठाम असते.”


  या शोमध्ये शमिताने राकेश तिला आवडतं असल्याचं राकेशला सांगितलं होतं. गेल्या काही दिवसांपासून शमिता आणि राकेशमध्ये नातं फुलंत असल्याचं दिसून येतंय. शोमधील इतर स्पर्धकांशी राकेशने जवळीक साधलेली शमिताला आवडत नसल्याचे दिसत आहे. शमिता आणि राकेश एकमेकांसमोर खूप चांगले क्षण घालवत आहेत. लोकांनाही हे रोमॅन्टीक कपल आवडत आहे.