‘स्टार किड’ कपूर गर्लचा कथक Dance Video Viral; बॉलिवूडमध्ये एंट्रीसाठी झालीये सज्ज

शनाया कपूर सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह आहे. आपल्या मैत्रिणींबरोबर मस्तीचे फोटोही ती शेअर करते. तिच्या या इन्साग्राम व्हिडिओवरही बऱ्याच कमेंट आल्यात, तर, काहीच वेळात लाखो व्ह्यूज मिळालेत.

    मुंबई : बॉलिवूड स्टारची (Bollywood Star) दुसरी पिढी आता एन्ट्री (Entry) घेत आहे. आलिया भटपासून अनन्या पांडे, जान्हवी कपूरनंतर आता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरही (Shanaya Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ती खास प्रशिक्षणही घेत आहे. शनाया नेहमीच आपले क्यूट फोटो आणि व्हिडिओ (Video) अपलोड करत असते.

    यावेळी तिने दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी (Actress Meena Kumari) यांच्या ‘पाकीझा’ सिनेमातल्या ठाढे रहियो या गाण्यावर तिने आपल्या कथ्थक शिक्षिकेबरोबर हा डान्स (Dance) केला आहे. पिवळ्या रंगाच्या अनारकली ड्रेस मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

    शनाया कपूर सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह आहे. आपल्या मैत्रिणींबरोबर मस्तीचे फोटोही ती शेअर करते. तिच्या या इन्साग्राम व्हिडिओवरही बऱ्याच कमेंट आल्यात, तर, काहीच वेळात लाखो व्ह्यूज मिळालेत.

    नव्या नवेली नंदानेही कमेंट केली आहे. तर, काही इन्स्टाग्राम युजर ‘वाह’ आणि ‘लाजवाब’ सारख्या कमेंट करत आहेत.

    shanaya kapoor actor sanjay kapoors daughter kathak dance perform on the song actor meena kumari