shubhmagal online

‘शुभमंगल ऑनलाईन’ (Shubhamangal Online) या मालिकेत काही दिवसांपासून शर्वरी आणि शंतनूच्या लग्नाचं वातावरण आहे.

    अनेक अडथळ्यानंतर अखेर शर्वरी (Sharvari) आणि शंतनूचं(Shantanu) लग्न होणार आहे. मेहंदी आणि हळदीच्या कार्यक्रमानंतर आता मालिकेत लग्नाची लगबग सुरु आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये शंतनू आणि शर्वरी मंडपात लग्नाच्या विधी करताना दिसत आहेत. त्यामुळे आत्ता यांच्या नात्याला नवी ओळख मिळणार असल्याचं दिसत आहे.

    ‘शुभमंगल ऑनलाईन’ (Shubhamangal Online) या मालिकेत काही दिवसांपासून शर्वरी आणि शंतनूच्या लग्नाचं वातावरण आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शर्वरी आणि शंतनूच्या मेहंदी आणि हळदीची सेरेमनी पाहायला मिळत होती. आत्ता नव्या प्रोमोमध्ये या दोघांची लगीनघाई सुरु झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे चाहते आनंदी आहेत.


    कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ ही मालिका लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुरु झाली होती. लॉकडाऊनमध्ये लग्नाचं बदललेलं स्वरूप यात हायलाईट करण्यात आलं होतं. या मालिकेत शंतनू आणि शर्वरीचं सुद्धा असचं ऑनलाईन लग्न झालं होतं. मात्र नवरी सासरी जायच्या वेळेसच शंतनूचा भूतकाळ त्याच्या समोर येऊन उभा राहतो. त्यामुळे एकचं गोंधळ सुरु होतो. आणि हे सर्व पाहून शर्वरीची आई तिला सासरी पाठवण्यास नकार देते. मात्र शर्वरी आत्ता तेच आपलं घर आणि शंतनू आपला नवरा असल्याचं सांगते.

    शर्वरीला शंतनूवर पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे ती आपल्या सासरी जाते.तिथे राहूनचं शंतनूला त्याच्या भूतकाळाशी लढायला मदत करते. मात्र दुसरीकडे शर्वरीची आई तिच्यावर  नाराज असते. तिला हे नातं मान्य नसतं. ती शर्वरीला आपल्या घरी परत घेऊन जाते. ज्यावेळी शंतनू तिला घ्यायला येतो. तेव्हा शर्वरीची आई तिच्यासमोर अनेक अटी ठेवते. आणि अनेक अडचणी निर्माण करते. आत्ता यासर्व अडचणींवर मात करत शंतनूने शर्वरीवरचं आपलं प्रेम सिद्ध केलं आहे.