sharadkelkar

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शरद केळकर चर्चेत आला आहे. तो म्हणजे अभिनेता अक्षय कुमरच्या लक्ष्मी या चित्रपटामुळे. अक्षयच्या लक्ष्मीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण चित्रपटात खऱ्या लक्ष्मीची भूमिका साकारलेल्या शरद केळकरची वाहवा झाली. त्याची ‘लक्ष्मी’ ही भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली होती.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शरद केळकर चर्चेत आला आहे. तो म्हणजे अभिनेता अक्षय कुमरच्या लक्ष्मी या चित्रपटामुळे. अक्षयच्या लक्ष्मीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण चित्रपटात खऱ्या लक्ष्मीची भूमिका साकारलेल्या शरद केळकरची वाहवा झाली. त्याची ‘लक्ष्मी’ ही भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली होती. लक्ष्मीच्या आधी शरदने ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. पण आज अनेक महिन्यांनंतर शरदने या चित्रपटाविषयी पोस्ट केली आहे. त्यामुळे शरदची ही पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)

 

शरदने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.  ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील हा फोटो आहे. हा फोटो शेअर करत शरदने लिहीलं आहे की ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अवतारात पहिल्यांदा येण्याचा अभिमान काही निराळाच होता’. सध्या सोशल मीडियावर शरदच्या या फोटोची जोरदार चर्चा सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)

 

शरदने दिलेल्या कॅप्शनवरुन हा फोटो ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक आहे. शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर मांडली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले होतं. तसेच या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, शरद केळकर आणि अभिनेत्री काजोल मुख्य भूमिकेत झळकले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)