sharad ponkshe in web series

प्लॅनेट मराठीच्या(planet marathi) काही वेबसीरिजची(web series) नावे घोषित करण्यात आली होती. त्यात आता आणखी एका वेबसीरिजची भर पडणार आहे. मात्र या वेबसीरिजचे नाव सध्या तरी गुलदस्त्यात आहे.

    प्लॅनेट मराठी(planet marathi) या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या(marathi OTT platform) एका नवीन वेबसीरिजच्या(web series) चित्रीकरणाचा आज मुंबईत शुभारंभ झाला. यापूर्वीच प्लॅनेट मराठीच्या काही वेबसीरिजची नावे घोषित करण्यात आली होती. त्यात आता आणखी एका वेबसीरिजची भर पडणार आहे. मात्र या वेबसीरिजचे नाव सध्या तरी गुलदस्त्यात आहे. असे असले तरी यातील कलाकारांची नावे मात्र जाहीर करण्यात आली आहेत. शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, तेजस बर्वे, पर्ण पेठे, उदय नेने अशी दमदार स्टारकास्ट असलेली ही वेबसीरिज कौटुंबिक आणि विनोदी स्वरूपाची असणार आहे.

    सहा भागांची ही वेबसीरिज एक कौटुंबिक कथा असून ही वेबसीरिज बघताना हे कुठेतरी आपल्याही घरात घडतंय, याची प्रेक्षकांना जाणीव होईल आणि त्यामुळेच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. या वेबसीरिजच्या निमित्ताने शरद पोंक्षे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत.

    या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “आजवर हाताळलेल्या विषयांपेक्षा हा जरा वेगळाच विषय आहे. ही वेबसीरिज प्रेक्षक आपल्या आयुष्याशी कुठेतरी जोडू शकतात. ही सीरिज ज्या विषयावर आधारित आहे, तो विषय खरोखरच गंभीर होता. मात्र तरीही आम्ही या गंभीर विषयाला विनोदाची जोड देत, अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने हा विषय मांडला आहे. अभिनयात पूर्ण मुरलेले कलाकार असल्याने या सर्व जणांनी आपापल्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे.”

    वर्जिनोशन्सची प्रथम निर्मिती असणाऱ्या या वेबसीरिजचे दिग्दर्शन अमित कान्हेरे यांचे असून योगेश विनायक जोशी यांनी संवादलेखन केले आहे. तर प्रतीक व्यास, अमित कान्हेरे यांनी निर्मिती केली आहे. विशाल संगवई डीओपीचे काम पाहिले असून ओंकार महाजन क्रिएटीव्ह प्रोड्युसर आहेत. रोहन-रोहन यांनी या वेबसीरिजला संगीत दिले आहे.