radheshyam movie - prerna

‘राधेश्याम’ चित्रपटात(radhyeshyam movie)युरोपमध्ये घडणारी प्रेमकथा आहे. या चित्रपटात पॅन इंडिया स्टार प्रभास(prabhas) आणि पूजा हेगडे(puja hegde) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पूजा हेगडेच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिचा पहिला लूक सादर केला आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रभासने आपल्या या ‘प्रेरणा’ची ओळख जगाला करुन दिली आहे. या निमित्ताने शेअर केलेल्या छायाचित्रात ओलिव्ह ग्रीन पोशाखात आणि फ्लोरल ओव्हरकोटमध्ये पूजा तिच्या सुंदर स्मितहास्यासह ट्राममध्ये बसलेली दिसत आहे.

या पोस्टवर पूजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत प्रभासने लिहिले की, “आमच्या ‘प्रेरणा’ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”

‘राधेश्याम’ हा त्रैभाषिक चित्रपट असून गुलशन कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत, याचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार करणार आहेत. हे चित्र यूव्ही क्रिएशन्सद्वारे निर्मित आहे.