शेहनाजच्या कुशीतला सोडला सिद्धार्थ शुक्लाने प्राण? वाचा काय घडलं ‘त्या’ रात्री!

सिद्धार्थच्या मृत्यूवेळी शहनाज त्याच्याजवळ होती आणि तिच्या डोळ्यादेखत सिडने प्राण सोडला, अशी माहिती समोर येत आहे.

    अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनाने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. काल २ सप्टेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचा मृत्यू झाला. तो या जगात नाही यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. त्याची सर्वात जवळची मैत्रिण शहनाज गिलची अवस्था तर बघवत नाही. ती काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीये. सिद्धार्थच्या मृत्यूवेळी शहनाज त्याच्याजवळ होती आणि तिच्या डोळ्यादेखत सिडने प्राण सोडला, अशी माहिती समोर येत आहे.

    काय घडलं त्या रात्री

    बुधवारी रात्री ९.३० वाजता सिद्धार्थ घरी आला तेव्हा त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यावेळी त्याच्या घरी त्याची आई व शहनाज होत्या. सगळ्यात आधी सिद्धार्थला लिंबू सरबत देण्यात आलं. नंतर आईसक्रीम खायला दिली. पण सिद्धार्थची अस्वस्थता वाढतच गेली. त्याला पुन्हा छातीत दुखायला लागलं. शहनाज व त्याच्या आईने त्याला विश्रांती करायचा सल्ला दिला. पण

    सिद्धार्थ झोपू शकत नव्हता. शहनाज त्याच्या जवळ राहून पाठ थोपटत होती. रात्री १.३० च्या सुमारास सिद्धार्थ शहनाजच्या कुशीतच झोपला. सकाळी ७ वाजता शहनाजची झोप उघडली तेव्हा सिद्धार्थ रात्रभर एकाच पोझिशनमध्ये असल्याचे आणि तो काहीही हालचाल करत नसल्याचं तिला जाणवले. तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने काहीही प्रतिसाद दिला नाही. ती घाबरली आणि ओरडत १५ व्या माळ्यावरून ५ व्या माळ्यावर आली. जिथे त्याची फॅमिली राहत होती. सिद्धार्थची बहिण धावत वर आली.  त्यांनी फॅमिली डॉक्टरला बोलवले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.