२१ वर्षांनंतर शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टीने रिक्रिएट केला तो सीन!

धडकन चित्रपटातील सुनील शेट्टीचा ‘तुम मुझे भूल जाओ ये मै होने नही दुंगा’ हा डायलॉग हिट ठरला होता. आता शिल्पा आणि सुनीलने सुपर डान्सर शोमध्ये हाच सीन रिक्रिएट केला आहे.

    ९०च्या दशकातील सुपरहिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘धडकन.’ या चित्रपटात शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आता ‘सुपर डान्सर ४’ या शोमध्ये सुनील शेट्टीने हजेरी लावताच चित्रपटातील एक सीन रिक्रिएट केला आहे.

    धडकन चित्रपटातील सुनील शेट्टीचा ‘तुम मुझे भूल जाओ ये मै होने नही दुंगा’ हा डायलॉग हिट ठरला होता. आता शिल्पा आणि सुनीलने सुपर डान्सर शोमध्ये हाच सीन रिक्रिएट केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

    ‘सुपर डान्सर ४’ या शोमध्ये गीता कपूर, अनुराग बासू आणि शिल्पा शेट्टी परिक्षक म्हणून दिसत आहेत. शोच्या आगामी भागामध्ये शिल्पा आणि सुनीलची मजामस्ती पाहायला मिळणार आहे. दरम्यान ‘धडकन’ चित्रपटातील गाण्यावर एकत्र डान्स करणार आहे. हा खास एपिसोड येत्या विकेण्डला प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मध्यंतरीच्या काळात संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टी शोमध्ये गैरहजर होती. तीच्या जागी अभिनेत्री मलायका आरोराने शोचे जजींग केले.