shilpa shetty brought ganesh idol

शिल्पाच्या घरी लालबागच्या राजाची(Lalbaugcha Raja) प्रतिकृती विराजमान होणार आहे. गणपती आणण्यासाठी शिल्पा गेल्याचा एक व्हिडिओ(Video OF Shilpa Shetty With Ganesh Idol) समोर आला आहे.

  गणेशोत्सव(Ganeshotsav 2021) जवळ आला की सगळीकडे उत्साहाचे वातावरण बघायला मिळते. घरोघरी बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जाते. बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Ganeshotsav At Shilpa Shetty`s Home) हीच्या घरी गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. शिल्पाच्या घरी लालबागच्या राजाची(Lalbaugcha Raja) प्रतिकृती विराजमान होणार आहे. गणपती आणण्यासाठी शिल्पा गेल्याचा एक व्हिडिओ(Video OF Shilpa Shetty With Ganesh Idol) समोर आला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

  शिल्पाच्या घरी दीड दिवस गणपती असतो. शिल्पा शेट्टी गणेशमूर्ती कला केंद्रामध्ये गणपतीची मूर्ती घेण्यासाठी आली होती. दरवर्षी शिल्पा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करताना दिसते. पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने पुन्हा एकदा सर्व कामांना पुन्हा सुरुवात केली आहे. अशात गणपती बाप्पाला घरी घेऊन जात असतानाही शिल्पाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिल्पाचा गणपती आणायला गेलेली असतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.