Video पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ शुटींगला हजर!

आज या आठवड्यातील भागाच्या शुटींगला सुरूवात झाली आहे. 2016 मध्ये या कार्यक्रमाला सूरवात झाली. शिल्पा या शोमध्ये पहिल्या सीझनपासून परिक्षक आहे.

  अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. १९ जुलैला राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक गोष्टींचा उलगडा होवू लागला आहे. मात्र या सगळ्याचा परिणाम शिल्पा शेट्टीवर झाला.

  राजच्या अटकेनंतर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असणारी शिल्पा काहीशी दूर झाली. सार्वजनिक कामात जाणही तिने टाळलं. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोमध्ये ही दिसली नाही. आता शिल्पा पुन्हा या कार्यक्रमात दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

  आज या आठवड्यातील भागाच्या शुटींगला सुरूवात झाली आहे. 2016 मध्ये या कार्यक्रमाला सूरवात झाली. शिल्पा या शोमध्ये पहिल्या सीझनपासून परिक्षक आहे. तिने शूटिंग पुन्हा सुरू केल्याने आम्हाला आनंद आहे. आशा आहे की, ती या सीझनच्या शेवटपर्यंत शोमध्ये राहील. तिचा पती अश्लील अॅप्स प्रकरणात अडकल्यानंतर कामावर परत येणे हा तिच्यासाठी भावनिक निर्णय होता. शिल्पाच्या जागी दुसऱ्या कोणाला शोधण्याची गरज नाही, म्हणून निर्माते आनंदी आहेत