तब्बल 14 वर्षानंतर शिल्पा शेट्टीचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन, 23 जुलैला हंगामा -2 रिलीज होणार, त्याच दिवशी राज कुंद्राच्या कोठडीचा निर्णय

राज कुंद्रा यांना 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. म्हणजे 23 जुलैला हंगामा २ चा ओटीटी प्रीमिय होईल, त्याच दिवशी राज यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात येईल की त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली जाईल याचा निर्णयही घेण्यात येईल.

  मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी ‘हंगामा 2’ सह 14 वर्षानंतर चित्रपटांमध्ये परतली आहे. हा चित्रपट 23 जुलैला हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. शिल्पा आणि तिच्या चाहत्यांसाठी हा एक सेलिब्रेशनचा काळ असावा. परंतु पॉर्न रॅकेटमध्ये राज कुंद्राला अटक झाल्याने केवळ शिल्पाच नाही तर कदाचित हंगामा -२ ची संपूर्ण टीम आता सेलिब्रेटीच्या मूडमध्ये येणार नाही. शिल्पा कॉमेडी चित्रपटाद्वारे कमबॅक करत आहे पण त्याचवेळी तिच्या वैयक्तिक आयुष्यात एक शोकांतिका घडली आहे.

  राज कुंद्रा यांना 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. म्हणजे 23 जुलैला हंगामा २ चा ओटीटी प्रीमिय होईल, त्याच दिवशी राज यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात येईल की त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली जाईल याचा निर्णयही घेण्यात येईल.

  कॅकनॉज डॉट कॉमच्या अहवालानुसार शिल्पा शेट्टी जवळपास 134 कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे. तिच्या कमाईचा मुख्य स्त्रोत ब्रँड एंडोर्समेंट आहे आणि आता लवकरच चित्रपटात देखील चमकणार आहे. ती तब्बल 14 वर्षांनी आता बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे, यामुळे येत्या काही वर्षांत तिची नेटवर्थ कैक टक्क्यांनी वाढू शकते. शिल्पाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

  शिल्पा शेट्टीचे घर

  शिल्पा शेट्टी आपल्या कुटूंबासह मुंबईतील लक्झरी घरात राहते. वृत्तानुसार या घराची किंमत जवळपास 24 कोटी रुपये आहे. इतकेच नाही, तर शिल्पाची देशात अनेक ठिकाणी मालमत्ता आहे.

  शिल्पा शेट्टीच्या लक्झरी कार

  शिल्पा शेट्टीला लक्झरी वाहनांची प्रचंड आवड आहे. तिच्याकडे बीएमडब्ल्यू आय 8, लॅम्बोर्गिनीसह अनेक महागड्या गाड्या आहेत. माध्यम अहवालांनुसार शिल्पा शेट्टी एका ब्रँडच्या कामासाठी जवळपास 1 कोटी रुपये घेते. ती बर्‍याच ब्रँड्ससाठी काम करते. या ब्रँड्ससाठी काम करून शिल्पाचा नेट वर्थ लक्षणीय प्रमाणात वाढला आहे.

  अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सध्या डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ होस्ट करताना दिसत आहेत. ती सध्या छोट्या पडद्यावर खूपच सक्रिय झाली आहे. परीक्षक म्हणून ती प्रेक्षकांना खूप आवडते. शिल्पा शेट्टीची कमबॅक फिल्म ‘हंगामा 2’ येत्या 23 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत परेश रावल, मीझान जाफरी आणि प्रणिता सुभाष महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. शिल्पा शेट्टी 14 वर्षानंतर पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.