८ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या फराह खानबरोबर शिरीष कुंदरने थाटला संसार, या चित्रपटाच्या सेटवर रंगली लव्हस्टोरी!

शिरीष यांनी सर्वप्रथम हा प्रस्ताव फराहसमोर ठेवला. पण त्याला टाईमपास करण्याची इच्छा नव्हती, तर फराहबरोबर त्याचे भविष्य पाहत होते.

  बॉलिवूडचे सुप्रसिद्ध एडिटर आणि दिग्दर्शक शिरीष कुंदर याचा आज वाढदिवस. ते ४८  वर्षांचे झाले आहेत. त्याचा जन्म २४ मे १९७३ला मंगलोर येथे झाला होता. शिरीषचे लग्न त्याच्यापेक्षा ८ वर्षांनी मोठी असलेली नृत्यदिग्दर्शक फराह खानशी झालं आहे. शिरीषने तिला लग्नासाठी कसं प्रपोज केलं ते फराहने स्वतः एका टॉक शो दरम्यान उघड केलं होतं. फराहच्या म्हणण्यानुसार, ८ वर्षांनी लहान असलेल्या शिरीषला ती आवडते हे माहिती नव्हतं. पण लवकरच तिला शिरीषच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज आला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

  ‘मैं हूं ना’ चित्रपटाच्या सेटवर फराह आणि शिरीषची प्रेमकथा सुरू झाली. शिरीषने चित्रपटात साइन करण्यापूर्वी फराहवर क्रश होते. जेव्हा त्याला या चित्रपटासाठी एडिटर म्हणून ऑफर देण्यात आली तेव्हा त्यांनी काही उशीर न करता लगेच स्विकारली. त्याने केवळ फराहवरील प्रेमापोटी हे केलं.  विशेष म्हणजे शिरीषलाही या नोकरीसाठी कमी पगार मिळाला होता. सुमारे ७ महिन्यांनंतर गोव्यात त्यांनी साखरपुडा केला होता. शिरीष यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “आम्ही परदेशात जाऊ शकत नाही, म्हणून गोवा निवडला. तेही एक रोमँटिक ठिकाण आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

  शिरीष यांनी सर्वप्रथम हा प्रस्ताव फराहसमोर ठेवला. पण त्याला टाईमपास करण्याची इच्छा नव्हती, तर फराहबरोबर त्याचे भविष्य पाहत होते. टॉक शो दरम्यान फराहने सांगितले होते की, “शिरीषने मला सांगितले – डार्लिंग, तुला माझ्याशी लग्न करायचं नसेल तर निघून जा. मला फक्त तुमच्याकडे पाहून माझा वेळ वाया घालवायचा नाही. जर तु सिरीयस असशील तर आपण लग्न करू.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shirish Kunder (@shirishkunder)

  फराहच्या म्हणण्यानुसार तीने खूप विचार केला आणि नंतर शिरीषचा प्रस्ताव स्वीकारला. २००४ मध्ये तिने रजिस्टर मॅरेज केलं आणि त्यानंतर दक्षिण भारतीय शैलीत विवाह केला. कारण शिरीष दक्षिण भारत (मंगलोर)चा आहे. २००८ मध्ये, फराहने तीन मुलांना जन्म दिला.