कंगना रणौतवरून शिवसेना आणि रिपाई आमनेसामने येण्याची शक्यता ?

आज बुधवार कंगना रणौत मुंबईसाठी (Mumbai) रवाना झाली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनाला Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तसेच या वादावरून शिवसेना आणि रिपाई (Shiv Sena and RPI) ही आता आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अभिनेत्री कंगना (Kangana) रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने विविध प्रकारच्या टीकेला समोरे जावे लागत आहे. आज बुधवार कंगना रणौत मुंबईसाठी (Mumbai) रवाना झाली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनाला Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तसेच या वादावरून शिवसेना आणि रिपाई (Shiv Sena and RPI) ही आता आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे एकेकाळी कंगनाचा विरोध करणारी करणी सेना आता तिला पाठिंबा देत आहे. यावेळी आरपीआय तिला संरक्षण देईल अशी घोषणा रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेली आहे.

कंगना आज मुंबई विमातळावर दाखल होणार असून शिवसेनेकडून तिला थोबाड फोडण्याची भाषा करण्यात आली होती. परंतु कंगनाला सुरक्षा देण्यासाठी रिपाईने तयारी दाखवली आहे. तसेच लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. कंगनाला आपलं मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कंगनाला रीपाइं संरक्षण देईल, असे ट्विट रामदास आठवले यांनी करत म्हटलं होतं.

४ सप्टेंबरला रामदास आठवले यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, “लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. कंगनाला आपलं मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. कंगनाला RPI संरक्षण देईल.