shivani rangole

अभिनेत्री शिवानी रांगोळेने एक नवं मिशन हाती घेतलं आहे. हे मिशन आहे ते दुचाकी चालवण्याचं. स्टार प्रवाहवर भेटीला येणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेतल्या भूमिकेसाठी शिवानी दुचाकी चालवायला शिकते आहे.

अभिनेत्री शिवानी रांगोळेने एक नवं मिशन हाती घेतलं आहे. हे मिशन आहे ते दुचाकी चालवण्याचं. स्टार प्रवाहवर भेटीला येणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेतल्या भूमिकेसाठी शिवानी दुचाकी चालवायला शिकते आहे. शिवानीसाठी हा अनुभव नवा आहे. या नव्या मिशनविषयी सांगताना शिवानी म्हणाली, ‘सुरुवातीला खूप भीती वाटत होती. मात्र सेटवर सगळ्यांनीच मला खूप मदत केली. मालिकेत मी वैभवी ही व्यक्तिरेखा साकारते आहे. दुचाकीवरचे बरेचसे सीन असल्यामुळे मी दुचाकी चालवायला शिकायचं ठरवलं. सेटवर वेळ मिळाला की माझा सराव सुरु असतो. मला खूप आनंदही होतोय की भूमिकेच्या निमित्ताने मला नवी गोष्ट शिकता आली.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Rangole (@rangshivani)

 

Shivani rangoli

हॉरर आणि रोमान्स असा अनोखा मिलाफ असणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ मालिकेतल्या शिवानीच्या नव्या लूकचीही चर्चा आहे. त्यामुळे अशीच नवनवी सरप्राईजेस पाहाण्यासाठी पाहायला विसरु नका नवी मालिका ‘सांग तू आहेस का’ .

स्टार प्रवाहवर ७ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेद्वारे अभिनेत्री सानिया चौधरी पदार्पण करते आहे. मुख्य भूमिका असलेली ही तिची पहिलीच मालिका. लहानपणापासूनच सानियाला अभिनय आणि नृत्याची आवड होती. सानिया मुळची पुण्याची त्यामुळे पुण्यातच तिने नृत्य शिकण्यासोबतच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. अनेक वर्कशॉप्स, नाट्यस्पर्धा आणि थिएटर केल्यानंतर तिला हिंदी वेबसीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सानियाचं टॅलेण्ट पाहून तिला स्टार प्रवाहच्या ‘सांग तू आहेस का’ मालिकेसाठी ऑडिशनसाठी सांगण्यात आलं. पाच ते सहा वेळा ऑडिशन आणि लूक टेस्ट दिल्यानंतर तिची वैदेही या व्यक्तिरेखेसाठी निवड झाली.