शिवानीने नवराष्ट्रबरोबर शेअर केला संजू ते PSI संजीवनी ढाले- पाटीलपर्यंतचा खास प्रवास!

शिवानी पोलिसांच्या वर्दीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शिवानीने हाच संजू ते पीएसआय संजीवनी ढाले- पाटीलपर्यंतचा खास प्रवास नवराष्ट्रबरोबर शेअर केला आहे.

  कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेमधील संजीवनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनारला तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची लाडकी झाली. संजूचं बोलणं, वागणं, तिची खास स्टाईल प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली. संजूचं ‘टॉक’ ही खास अक्शन लहानमुलांमध्येसुद्धा लोकप्रिय झाली. त्याचबरोबर संजू आणि रणजीत प्रेक्षकांची आवडती जोडी बनली. नुकतच मालिकेमध्ये एक नवं वळण आलं आहे. शिवानी पोलिसांच्या वर्दीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शिवानीने हाच संजू ते पीएसआय संजीवनी ढाले- पाटीलपर्यंतचा खास प्रवास नवराष्ट्रबरोबर शेअर केला आहे.

  शिवानीचा संजू ते पीएसआय संजीवनी पर्यंतचा प्रवास भन्नाट होता. कारण या निमित्ताने संजीवनीच एक वेगळं रूप प्रेक्षकांसमोर येणार होतं. आजपर्यंत खट्याळ, बडबड करणारी संजीवनी वर्दी अंगावर चढताच तिच्यात होणारा बदल प्रेक्षकांनी अनुभवला आणि शिवानीनेही हा बदल खूप एन्जॉय केला. या विषयी बोलताना शिवानी म्हणाली, ‘संजू आता नव्या रूपामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या प्रवासामध्ये मला खूप नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या पहिली गोष्ट म्हणजे मी एका दिवसातच बुलेट चालवायला शिकले. संजूने पोलिस होणं ही गोष्ट माझ्यासाठी खूप खास आहे. मला खूप चांगली संधी मिळाली असे मला वाटले. कारण माझे वडिल देखील पोलिस खात्यामध्ये काम करतात. ते बॅक ऑफिसमध्ये सीनियर हेड क्लर्क आहेत. जेव्हा मी वर्दी घालून त्यांना व्हिडीओ कॉल केला तेव्हा त्यांना मला बघून खूप आनंद झाला. त्यांना आनंदी पाहून मी भावूक झाले.

  जबाबदारी वाढली

  खरतर संजू रणजीतचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी पोलीस झाले. पण जबाबदारी मात्र शिवानीची वाढली. कारण वर्दी अंगात चढताचक्षणी जबाबदारीची जाणीव झाली. ती सांभाळ, शुटींग व्यतिरीक्तही तीचा अपमान होणार नाही याकडे मी कटाक्षाने लक्ष दिलं. खरतर लहानपणापासून मी पोलिसांना घाबरायचे किंवा त्यांच्या दरऱ्याची भिती वाटायची. पण आज मात्र खाहीसं उलटं चित्र आहे. आज शुटींग निमित्ताने मी वर्दीत असले की लोकं मला घाबरतात. त्यावेळेस मला खूप मज्जा वाटते. पण अनेकजण वर्दीत असतानाही ओळखतात. पण खरतर या भूमिकेला न्याय देणं हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता. खऱतर मी पोलिसांच्या भूमिकेत दिसणार हे मला कळल्यावरच माझं असं झालं की हे शक्यच नाहीये. पण ज्यावेळी ती वर्दी अंगावर चढली तेव्हा माझे पाय थरथर कापत होते. मला काहीच सुधरत नव्हतं. पण माझ्या पाठीचा कठा आपोआप ताठ झाला आणि पोलीसी रूबाब माझ्यात आला. पहिल्यांदा वर्दी अंगावर चढल्यावर माझ्यापेक्षा जास्त खूष मालिकेतले इतर कलाकार होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यावर मलाही वाटलं की हे आपण करू शकतो.

  संजू ते पीएसआय संजीवनी

  एकाच मालिकेत अशा दोन वेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळणं हे माझ्यासाठी अभिनेत्री म्हणून खूप भारी होतं. संजूचा प्रवास सगळ्यांनी आधीपासून पाहिला आहे. त्यामुळे सगळ्यांमाहितेय संजू कशी होती आणि त्या संजूला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं. त्यामुळे या संजीवनीला प्रेक्षक स्विकारतील की नाही याची काळजी होती. कारण रणजीतचं एसीपी असणं प्रेक्षकांच्या मनात आहे. प्रेक्षक त्याच्यासाठी अक्षरश: वेडे आहेत. त्यामुळे संजूला पोलिसांच्या वर्दीच बघणं हे माझ्यासाठीच खूप अवघड होतं. तर ते प्रेक्षकांसाठी किती असेल हे माझ्या मनात नेहमी यायचं. पण प्रेक्षकांचा खूपच कमाल प्रतिसाद भूमिकेला मिळाला. त्यामुळे ही भूमिका करताना खूप मज्जा येते.  एकूणच ही प्रोसेस खूप भन्नाट होती.

  अॅटिट्युड चेंज केला..

  या भूमिकेसाठी अॅटिट्युड महत्त्वाचा होता. त्या बदल्याण्यासाठी मला खास मेहनत घ्यावी लागली. तिचं चालणं बोलणं सगळंच नवीन होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं बॅलन्स सांभांळणं महत्त्वाचं होतं. संजीवनी उद्धटही नाही वाटली पाहिजे आणि त्याचबरोबर ती डॅशिंगही वाटली पाहिजे. रणजीतने हे कॅरेक्टर इतक्या वर नेलं आहे की, माझ्यासाठी ही भूमिका करणं कठीण होतं. मला साडी सांभाळण्याची सवय होती. पण तो युनीफॉर्म सांभाळंणं ही खरी जबाबदारी होती.

  बुलेट चालवणं टास्क होता

   मला ती बुलेट अजिबात झेपत नाही. पहिल्या दिवशी बुलेट चालवली तेव्हा मला ही खात्री होती की मी बुलेट कोणाला धडकणार नाही पण मला झेपेल की नाही याचीच काळजी होती. मला सगळ्यांनी सांगितली हा बॅलेन्सचा खेळ आहे. तो सांभाळता आला की गाडी चालवणं सहज शक्य होतं. मला कार येत असल्यामुळे गेअरचा अंदाज लगेच जमला आणि मी एका दिवसात गाडी शिकले. त्याचबरोबर आजपर्यंत कधीच फायटींग केली नव्हती. पण मालिकेच्या निमित्ताने तेही केलं. मालिकेत ज्या माणसांना मला मारायचं असायचं ती माणसं माझ्याहून मोठी, धिप्पाड होती आणि मी एकदम छोटी दिसायचे त्यांच्यासमोर त्यामुळे मी यांना कशी मारायची असा प्रश्न पडायचा. पण मणीराजने मला काही ट्रीक्स शिकवल्या होत्या. त्यामुळे फायटींग सीन करणं खूप सोप्प झालं. आणि माझे फायटींग सिक्वेन्स बघून माझ्या घरचेही खूप खूश झाले आणि माझ्यातल्याच काही नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या.

  तो सीन महत्त्वाचा

  खरतर रणजीतला अटक करणं हा संजीवनीसाठी खूप मोठा टास्क होता. कारण संजूचा रणजीतवर त्या बाबतीत खूप विश्वास आहे की अशी चूक रणजीतकडून कधीच घडू शकत नाही. दादासाहेबांचे आणि त्याचे मतभेद असले तरी तो कधीच कोणाला हानी पोहचवणार नाही असा रणजीत आहे. त्यामुळे संजूचा खूप विश्वास आहे. पण सगळेच पुरावे त्याच्याविरोधात असल्यामुळे एक गुन्हेगार ते नवरा असा सगळा स्ट्रगल आहे. हा सीनचा स्क्रीनप्ले वाचला होता तेव्हा असं वाटलं की मी व्हिलन होतेय की काय असं वाटलं. या पुढे मालिकेत अनेक इंट्रेस्टींग गोष्टी बघायला मिळणार आहेत.