ऑस्कर नॉमिनेशनची घोषणा करताना प्रियांकाने घातलेला २ लाखांचा ड्रेस तर ३२ लाखांच घड्याळ, काय आहे त्या खास जाणून घ्या!

प्रियांकाने जे गुलाबी रंगाचे बेली सॅण्डल परिधान केले होते. त्याची किंमत ही ५४ हजार आहे. एकूण प्रियांकाच्या या लूकची किंमत ही ३४.८ लाख एवढी आहे

    नुकताच ९३ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या नॉमिनेशनची घोषणा करण्यात आली. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने आणि तिचा पती निक जोनसने या नॉमिनेशनची घोषणा केली. या नॉमिनेशन सोहळ्यादरम्यान प्रियांका आणि निकने चांगलीच धमाल केल्याचं पाहायला मिळालं दोघांनी देखील या सोहळ्यातले खास फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यावेळी प्रियांकाने घातलेला ड्रेस आणि हातातील घडाळ्याने सगळ्यांचे लक्ष वेधले.

    या सोहळ्यासाठी प्रियांकाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर मॅचिंग असं निळ्या बेल्टचं घड्याळ तिने घातल्याचं दिसतंय. तर गुलाबी रंगाची बेली सॅण्डल तिने घातल्या आहेत. प्रियांकाने परिधान केलेल्या त्या डिझायनर निळ्या ड्रेसची किंमत ही १.७ लाख रूपये आहे. प्रियांकाने Bvlgari Diva ची ड्रीम वॉच घातलं आहे. ई-कॉमर्स पोर्टल्सवर प्रियांकाच्या या घड्याळाची किंमत ही ३२ लाख ४७ हजारांच्या जवळपास आहे. हे घड्याळ १८ कॅरेट रोज गोल्ड केस आणि हिऱ्यांनी जडलेली आहे.

    तर प्रियांकाने जे गुलाबी रंगाचे बेली सॅण्डल परिधान केले होते. त्याची किंमत ही ५४ हजार आहे. एकूण प्रियांकाच्या या लूकची किंमत ही ३४.८ लाख एवढी आहे