कोरोनाविषयक प्रबोधन करणाऱ्या तीन लघुपटांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल!

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 'सोशल डिस्टन्स' ठेवून सहकार्य करण्याची गरज आहे. 'सुरक्षित अंतर पाळा, कोरोना संसर्ग टाळा' असा संदेश या लघुपटांमधून देण्यात आला आहे.

    कोरोनाविषयक प्रबोधन करणाऱ्या तीन लघुपटांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. पोर्ट ब्लेयर, सिंगापूर व इंडोनेशिया येथील फेस्टिवलमध्ये आशिष निनगुरकर लिखित-दिग्दर्शित लघुपटांनी मराठीचा झेंडा फडकवला आहे. आशिषनं घरी राहून कोरोनाविषयक सामाजिक संदेश देणाऱ्या ‘नियम’, ‘कुलूपबंद’ व ‘संक्रमण’ या लघुपटांची निर्मिती केली होती. अत्यंत कमी वेळेत सामाजिक संदेश देणाऱ्या या लघुपटांची नोंद यापूर्वी कॅनडाच्या ‘वर्ल्ड ग्लोब’ या संस्थेनं घेतली होती.

    याचा प्रीमियर टोरंटोमध्ये पार पडला होता. ‘एकत्र येण्याची नको घाई, पुन्हा हा जन्म नाही’, ‘नियम पाळा, कोरोना टाळा’ व बाहेरच्या जिल्ह्यांतून घरी आल्यावर ‘क्वारंटाईन’ म्हणून ‘नियम’ पाळणं बंधनकारक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘सोशल डिस्टन्स’ ठेवून सहकार्य करण्याची गरज आहे. ‘सुरक्षित अंतर पाळा, कोरोना संसर्ग टाळा’ असा संदेश या लघुपटांमधून देण्यात आला आहे.

    या लघुपटांची निर्मिती काव्या ड्रीम मुव्हीज अंतर्गत किरण निनगुरकर यांनी केली असून, यामध्ये अशोक निनगुरकर, जयश्री निनगुरकर, स्वरूप कासार, अनुराग निनगुरकर, प्रदीप कडू, प्रतिश सोनवणे, विजय कांबळे, सुमेध गायकवाड, सुनील जाधव व सिद्धेश दळवी  यांनी भूमिका साकारल्या आहेत. हे लघुपट एअरटेल प्लेयर, हंगामा प्ले व एमएक्स प्लेयरवर आहेत.