समाजातील लिंगभेदाला अधोरेखित करणारा विद्या बालनचा लघुपट ‘नटखट’

यूट्यूबवरील ‘वी आर वन: ए ग्लोबल फिल्म फेस्टिवल’ मध्ये २ जून २०२० ला प्रीमियर करण्यात आलेला ‘नटखट' शान व्यासद्वारे दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला व विद्या बालन द्वारा निर्मित

 यूट्यूबवरील ‘वी आर वन: ए ग्लोबल फिल्म फेस्टिवल’ मध्ये २ जून २०२० ला प्रीमियर करण्यात आलेला ‘नटखट’ शान व्यासद्वारे दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला व विद्या बालन द्वारा निर्मित एक लघुपट आहे. या लघुपटाला अन्नूकंपा हर्ष आणि शान व्यासने सहयोगी निर्मात्याच्या रूपात सनाया ईरानी जौहरी यांच्यासोबत लिहिले आहे. या लघुपटात विद्या बालन आणि बाल कलाकार सानिका पटेल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

लघुपटाचे कथानक एका अशा आईच्या आसपास फिरते जी आपल्या मुलावर लैंगिक समानतेचे संस्कार करण्यासाठी आग्रही आहे. या लघुपटात दाखवण्यात आले आहे की मुलांमध्ये कशातऱ्हेने मर्दानगी आणि पितृसत्ताक विचारांना अगदी छोट्या मोठ्या उदाहरणांनी सुरुवात होते. लघुपटात आपल्या पितृसत्ताक वातावरणातील सद्यस्थितीदेखील दाखवण्यात आली आहे आणि हे देखील मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की हे बदलण्यासाठी आपल्याला बदलण्याची अतिशय आवश्यकता आहे. विद्या बालनची व्यक्तिरेखा अशा विविध मुद्द्यांवर दर्शकांना विचार करायला प्रवृत्त करेल.  लघुपटाच्या संकल्पनेबाबत बोलताना दिग्दर्शक शान व्यास म्हणाले की, नटखट हा एक असा लघुपट आहे जो लिंगभेदाचे मुख्य तत्व अधोरेखित करतो. आपण महिला अत्याचारांविरोधात कितीही कायदे आणि संस्था काढल्या तरीही लहान वयातील मुलांचे योग्य पालन-पोषण आणि समानतेचे महत्व शिकवण्यामुळेच आपल्याला अपेक्षित बदल आणता येतील.

दिग्दर्शक पुढे म्हणाले की, जेव्हा मी आणि माझी सह-निर्माता अन्नूकंपा हर्ष या लघुपटाच्या रिसर्चसाठी बाहेर पडलो तेव्हा आम्हाला जाणवले की, अगदी लहानपणापासूनच समाजात मुलांसाठी उपलब्ध असलेले सर्व संकेत हे पुरुष आणि स्त्रियांमधील एका शक्ति-अंतराचेच प्रतिनिधित्व करत असतात. आपल्या सभोवती बघितल्यावर पोलीस, सेनेतील जवान, पुरुष राजनीतिज्ञ, शाळेतील पुरुष प्रिंसिपल आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात देखील हीरोच्या भूमिकेत त्यांना पुरुषच नजरेस पडतो.  मुलांवर प्रभाव टाकणाऱ्या बाहेरच्या गोष्टींबाबत शान व्यास सांगतात, या सामाजिक शक्ती खूप सामर्थ्यशाली असतात आणि पालक त्यावर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. मुलं याच गोष्टी आत्मसात करतात आणि त्यांच्या मनात ही गोष्ट विशेष घर करते की केवळ पुरुषच सर्वश्रेष्ठ आहेत. मात्र पालक आणि त्यांची मुले या सगळ्या असमानतेकडे कशातऱ्हेने पाहतात, यावर आपल्याला या गोष्टी बदलता येतील.