shraddha kapoor

हिंदी चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्रींनी नागिणीची भूमिका साकारली. आता अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या(shraddha kapoor) नावाची भर नागिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींमध्ये पडणार आहे. श्रद्धा कपूरच्या या नव्या चित्रपटाचं नाव अद्याप जाहीर झालं नाही. मात्र विशाल फुरिया त्याचं दिग्दर्शन करणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

श्रद्धा कपूरने यासंदर्भातील ट्विटमध्ये म्हटले आहे की, ऑनस्क्रीन नागिणीची भूमिका साकारायला मिळण माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.  श्रीदेवी यांना नगिना आणि निगाहें या चित्रपटात  मी नागिणची भूमिका साकारताना पाहिले आहे. अशा प्रकारची भूमिका साकारण्याची माझी फार इच्छा होती.

श्रद्धा कपूरचा हा आगामी प्रोजेक्ट तीन चित्रपटांची सीरिज असेल. निखिल द्विवेदी त्याचे निर्माते असतील. श्रद्धाने याअगोदर ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर आता ती एका इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारणार आहे.