shreya bugde

एमएक्स प्लेयर एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची प्ले ओरिजनल ‘बायकोला हवं तरी काय' ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. श्रेया बुगडे, अनिकेत विश्वासराव आणि निखिल रत्नपारखी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिरीजचे दिग्दर्शन बहुआयामी अशा प्रियदर्शन जाधवने  केले आहे. या वेबसिरीजला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून याचे  मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अनिकेत विश्वासराव आणि श्रेया बुगडे यांचे वेगवेगळे 'लूक्स' या एकाच वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

नुकतीच एमएक्स प्लेयर एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची प्ले ओरिजनल ‘बायकोला हवं तरी काय’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. श्रेया बुगडे, अनिकेत विश्वासराव आणि निखिल रत्नपारखी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिरीजचे दिग्दर्शन बहुआयामी अशा प्रियदर्शन जाधवने  केले आहे. या वेबसिरीजला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून याचे  मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अनिकेत विश्वासराव आणि श्रेया बुगडे यांचे वेगवेगळे ‘लूक्स’ या एकाच वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

shreya bugde

एम.एक्स.प्लेयरने आपल्या प्रत्येक वेबसिरीजमध्ये नावीन्य राखत प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा अविरत जपला आहे आणि यापुढेही तो जपणार आहेत. एम.एक्स.प्लेयरच्या ‘आणि काय हवं’ ते अगदी अलीकडच्या ‘समांतर’ या वेबसिरीजपर्यंतच्या सर्वच सिरीज आणि त्यांचे विषय अतिशय वेगळे आणि आता पर्यंत कधीही न पाहिलेले असे होते. आताच प्रदर्शित झालेल्या ‘बायकोला हवं तरी काय’ ही वेबसिरीज सुद्धा अशीच हटके आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

 

या वेबसिरीजचे अजून एक खासियत म्हणजे कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आणि हँडसम अनिकेत विश्वासराव ही नवीन आणि फ्रेश जोडी. या वेबसिरीजबद्दल सांगताना श्रेया म्हणाली, ” मी यात एका सामान्य गृहिणीची भूमिका निभावत आहे. तिला तिच्या नवऱ्याने अपग्रेड व्हावे असे वाटत असते. त्यासाठी ती देवाजवळ नेहमी मागणे मागते. तेव्हा तिला देव प्रसन्न होतो आणि त्यानंतर जी मजा यायला सुरुवात होते यावर ही  सिरीज आहे.”

अनिकेत त्याच्या भूमिकेबद्दल सांगतो, ‘मी खूप भाग्यवान आहे की मला एकाच वेबसिरीज मध्ये अनेक भूमिका निभावण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रेक्षकांना प्रत्येक भागात नवीन काहीतरी पाहायला मिळणार हे नक्की. ही सिरीज करताना खूप मजा आली. शिकायला मिळालं. सिरीज बघतांना सर्व स्त्रियांना आणि पुरुषांना आपल्यासोबत सुद्धा असे घडले तर? असे वाटेल. सर्वांची मने जोडणारी अशी ही सिरीज आहे.