shreya bugde

‘चला हवा येऊ द्या’ च्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवणारी श्रेया बुगडे(shreya bugde) आता सूत्रसंचालिकाच्या (anchor)भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. यंदाच्या झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची  श्रेया बुगडे करणार आहे. तिला या भूमिकेत काम करताना पाहणे हे तिच्या चाहत्यांसाठी आनंददायी असणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’ च्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवणारी श्रेया बुगडे(shreya bugde) आता सूत्रसंचालिकेच्या (anchor)भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. यंदाच्या झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया बुगडे करणार आहे. तिला या भूमिकेत काम करताना पाहणे हे तिच्या चाहत्यांसाठी आनंददायी असणार आहे.

कॉमेडी अवॉर्ड्सच्या सूत्रसंचालिकेची भूमिका श्रेया सारखी कॉमेडी क्वीन निभावणार असल्यामुळे यंदाचा हा पुरस्कार सोहळा अविस्मरणीय ठरेल, श्रेयासोबत महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर भाऊ कदम आणि योगेश शिरसाट ही सूत्रसंचालन करणार आहे.

आपल्या या नवीन भूमिकेबद्दल  श्रेया म्हणाली, “यंदाचं झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचं स्वरू  वेगळं होतं. हे अवॉर्ड्स यावर्षी व्हर्च्युअली करण्यात आले. त्यात मला सूत्रसंचालनाची जाबदारदारी दिली. त्यामुळे थोडं चॅलेंजिंग वाटलं. कारण प्रत्येक वर्षी ऑडियन्समध्ये कलाकार बसलेले असतात. ज्यांच्यावर पंच लिहिले जातात किंवा लाईव्ह ऑडियन्स असतानाचा गिव्ह अँड टेक खूप वेगळा असतो. यंदा सर्व नॉमिनीज आमच्यासोबत व्हर्च्युअली जोडले गेले होते, त्यामुळे हा वेगळा आणि आव्हानात्मक अनुभव होता. भाऊ कदम आणि योगेश शिरसाट यांनी मला खूप चांगली साथ दिली. आम्हाला हा वेगळा प्रयोग करताना खूप मजा आली आणि प्रेक्षकांना ते बघताना देखील नक्कीच मजा येईल याची मला खात्री आहे.”