‘सीता’रूपी श्रीयाचा ‘कान’मध्ये डंका, सोशल मीडियावर दिली चाहत्यांना माहिती!

श्रीयाची भूमिका असलेली एक शॅार्ट फिल्म सध्या देश-विदेशातील सिने महोत्सवांमध्ये आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. या लघुपटाचं शीर्षक 'सीता' आहे. याचं दिग्दर्शन अभिनव सिंग यांनी केलं आहे.

    सध्या हिंदीसोबतच दक्षिणात्य चित्रपटांमध्ये रमलेली मराठमोळी अभिनेत्री या वर्षाच्या सुरुवातीला ‘हाथी मेरा साथी’ या चित्रपटामुळे चर्चेत होती. लॅाकडाऊनमुळं हा चित्रपट प्रदर्शित होऊ न शकल्यानं श्रीयाचं नवं रूप प्रेक्षकांना पाहता आलं नाही. या चित्रपटात श्रीयानं पत्रकाराची भूमिका साकारली आहे. याखेरीज श्रीया आणखी एका नव्या अवतारात प्रेक्षकांना दर्शन देणार आहे.

    श्रीयाची भूमिका असलेली एक शॅार्ट फिल्म सध्या देश-विदेशातील सिने महोत्सवांमध्ये आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. या लघुपटाचं शीर्षक ‘सीता’ आहे. याचं दिग्दर्शन अभिनव सिंग यांनी केलं आहे. कान कोर्ट मेट्राज शॅार्ट फिल्म कॅार्नर २०२१ मध्ये ‘सीता’ दाखवण्यात येणार आहे. श्रीयानं स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट लिहीत याबाबतची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.

     भारतातून पाठवण्यात आलेल्या ६ शॅार्टफिल्ममध्ये ‘सीता’चा समावेश आहे. दया एन्टरटेन्मेंट प्रा. लि. आणि बिग बॅनर फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या ‘सीता’मध्ये ओम कनोजीया, देवेश रंजन, लिलपूट आणि त्रिशान यांच्या भूमिका आहेत.