बडे अच्छे लगते हैं – 2’ मालिकेत राम कपूरच्या आईची भूमिका करणार शुभावी चोक्सी!

शुभावी चोक्सी यातील एक महत्त्वाचे पात्र रंगवणार आहे. टेलिव्हिजन उद्योगात विविध प्रकारच्या भूमिका करण्याबद्दल ओळखल्या जाणार्‍या शुभावीने मोठ्या पडद्यावरही “धडक” दिली आहे.

    एकता कपूरने बडे अच्छे लगते हैं या अत्यंत लाडक्या मालिकेच्या दुसर्‍या सत्राची जाहिरात केल्या-केल्याच अनेक नजरा तिकडे वळल्या होत्या. या मालिकेतील राम आणि प्रिया ही लोकप्रिय जोडी या सत्रात साकारणार आहेत, नकुल मेहता आणि दिशा परमार. तिशीत असलेल्या या जोडप्यातील अबोध आणि गुंतागुंतीचे नाते उलगडून दाखवणार्‍या या मालिकेत शहरी एकाकीपण आणि इतर बरेच काही सादर होणार आहे.

    यात केवळ दोन प्रमुख पात्रे नाही, तर त्यांची कुटुंबेही आहेत. शुभावी चोक्सी यातील एक महत्त्वाचे पात्र रंगवणार आहे. टेलिव्हिजन उद्योगात विविध प्रकारच्या भूमिका करण्याबद्दल ओळखल्या जाणार्‍या शुभावीने मोठ्या पडद्यावरही “धडक” दिली आहे. शुभावी या मालिकेत राम कपूरच्या सावत्र आईच्या, नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे.

    आपल्याला मिळालेल्या भूमिकेबद्दल शुभावी चोक्सी म्हणते, “बडे अच्छे लगते हैं मालिकेने टेलिव्हिजनच्या मालिका बघणार्‍या प्रेक्षकांच्या अभिरुचीला नवीन वळण दिले होते. या मालिकेत दाखल होताना आणि या लोकप्रिय फ्रँचाइझचा एक भाग होताना मला किती आनंद होत आहे, हे मी सांगू शकणार नाही. मालिकेच्या या दुसर्‍या सत्राबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे आणि पहिल्या सत्रावर केले, तसेच भरभरून प्रेम ते या सत्रावरदेखील करतील अशी मला आशा आहे.”