shubhankar_tawde

सोशल मीडिया हा कलाकार आणि चाहत्यांना जोडणारा दुआ आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. कलाकार आपल्या चाहत्यांसांठी नेहमी सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट करत असतात आणि चाहते देखील त्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. सध्या अभिनेता शुभंकर तावडे सोशल मीडियावर एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षक आणि चाहत्यांना पाहायला मिळतोय. त्याचा हा वेगळा अवतार नक्की कशासाठी आहे हा प्रश्न प्रेक्षक आणि चाहत्यांना पडला होता आणि त्याचं उत्तर म्हणजे 'टॉकीज कट्टा'.

सोशल मीडिया हा कलाकार आणि चाहत्यांना जोडणारा दुआ आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. कलाकार आपल्या चाहत्यांसांठी नेहमी सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट करत असतात आणि चाहते देखील त्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. सध्या अभिनेता शुभंकर तावडे सोशल मीडियावर एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षक आणि चाहत्यांना पाहायला मिळतोय. त्याचा हा वेगळा अवतार नक्की कशासाठी आहे हा प्रश्न प्रेक्षक आणि चाहत्यांना पडला होता आणि त्याचं उत्तर म्हणजे ‘टॉकीज कट्टा’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shubhankar Tawde (@shubhankar_tawde)

 

शुभंकर तावडे हा झी टॉकीज या वाहिनीसाठी ‘टॉकीज कट्टा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. या कार्यक्रमात मराठी कलाकारांशी शुभंकर गप्पा मारणार असून एक छान चर्चा त्यांच्यात रंगणार आहे. हा कार्यक्रम १८ डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात शुभंकर टाईमपास आणि टाईमपास २ मधील कलाकारांशी गप्पा मारणार आहे. तेव्हा हा चॅट शो प्रेक्षकांचं धमाल मनोरंजन करेल आणि शुभंकर म्हणजेच टॉकीज कट्टाचे सूत्रसंचालक माननीय शुभंकर जी तावडे हे प्रत्येक आठवड्यात अशाच काही कलाकारांसोबत चाहत्यांची भेट घडवून आणणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shubhankar Tawde (@shubhankar_tawde)

 

त्यामुळे पाहायला विसरू नका टॉकीज कट्टा शुक्रवार १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीजच्या सोशल मीडियावर.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shubhankar Tawde (@shubhankar_tawde)