‘गली बॅाय’ फॅार्मात ‘बंटी और बबली २’, ‘फोन भूत’ बरोबरच आणखी एका चित्रपटात लागली वर्णी!

काही दिवसांपूर्वी तिनं अनन्या पांडेला मुख्य भूमिकेसाठी निवडलं आणि आता अनन्याच्या जोडीला सिद्धांतची निवड केली आहे. याशिवाय 'द व्हाइट टायगर' फेम आदर्श गौरवही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

    रणबीर सिंग-आलिया भट्टच्या ‘गली बॅाय’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत नावारूपाला आलेला सिद्धांत चतुर्वेदी सध्या भलताच फॅार्ममध्ये आहे. आदित्य चोप्राच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘बंटी और बबली २’सोबतच तो ‘फोन भूत’ या आगामी चित्रपटातही दिसणार आहे. याखेरीज शकुन बत्रांचा आगामी चित्रपटही सिद्धांतकडे आहे. दिग्दर्शिका झोया अख्तरनंही आपल्या आगामी चित्रपटाची कास्ट फायनल केली आहे.

    काही दिवसांपूर्वी तिनं अनन्या पांडेला मुख्य भूमिकेसाठी निवडलं आणि आता अनन्याच्या जोडीला सिद्धांतची निवड केली आहे. याशिवाय ‘द व्हाइट टायगर’ फेम आदर्श गौरवही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘गली बॅाय’चं दिग्दर्शन झोयानंच केल्यानं सिद्धांतची काम करण्याची शैली तिला ठाऊक आहे. अनन्यासोबत ती प्रथमच काम करणार आहे. सध्या या चित्रपटाचं काम प्राथमिक पातळीवर सुरू आहे.

     कोरोनाची परिस्थिती निवळताच पुढील गोष्टी मार्गी लागतील आणि सिनेमाचं शूट सुरू केलं जाईल अशी माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे झोयाच्या चित्रपटाच्या निमित्तानं अनन्या आणि सिद्धांत दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. याखेरीज शकुन बत्रांच्या अनटायटल चित्रपटात दोघे दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहेत.